महाराजांनी खानाचा कोथळा काढला, हा सीन आव्हाडांना खटकला?

अतुल भातखळकरांचा व्हिडीओ व्हायरल..

    08-Nov-2022
Total Views |
har har mahadev
 
 
 
मुंबई ( har har mahadev ) : छात्रपती शिवाजी महाराजांच्या नावे जातीपातींचे गलिच्छ राजकारण खेळण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कायम आघाडीवर असतो. याचा प्रत्यय नुकताच ठाण्यातील व्हीव्हीआना मॉलमध्ये आला. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी 'हरहर महादेव' या मराठी सिनेमाचा चालू खेळ जबरदस्तीने बंद पडला. आव्हाड व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या गुंडाशाहीचा मुंबई भाजप प्रभारी, आमदार अतुल भातखळकर यांनी ट्वीटरच्या माध्यमातून खरपूस समाचार घेतला आहे.
 
 
सध्या भातखळकरांचा व्हिडीओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये "जेव्हा जेव्हा राष्ट्रभक्तीचे विषय येतात, तेव्हा जितेंद्र आव्हाड त्याला विरोध करण्याचा प्रयत्न करतात", असा दावा भातखळकरांनी केला आहे. तसेच " छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढला, हे चित्र 'हर हर महादेव' चित्रपटात दाखवलं, बहुदा ते दृश्य आव्हाडांना सहन झाले नाही. त्यामुळेच त्यांनी 'हर हर महादेव' चित्रपट बंद पडला', अशा तिखट शब्दात भातखळकरांनी आव्हाडांना सुनावले आहे. थिएटरमध्ये फक्त मारहाण केल्याचा गुन्हा पुरेसा नाही. राष्ट्रीय भावनांना धक्का पोहचवल्याचा गुन्हा दाखल करून आव्हाडांना अटक करा, अशी मागणीही अतुल भातखळकरांनी ट्वीटर वरून केली आहे.
 
 
 
 
 
मागे बऱ्याच वर्षांपूर्वी मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहात 'मी नथुराम गोडसे बोलतोय' या मराठी नाटकाची बस जाळण्यात आली होती. त्याबाबत जितेंद्र आव्हाड यांची संदिग्ध भूमिका होती. लॉकडाऊनच्या काळात जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या मंत्री पदाचा गैर फायदा घेत अनंत कारमुसे यांना आपल्या ऑफिसवर नेऊन मारहाण केली होती.त्यामुळे एकीकडे गांधीजींचे नाव घ्यायचे आणि दुसरीकडे आपल्या गुंडांसमवेत संविधानविरोधी कृत्य करणाऱ्या आव्हाडांविरोधात राष्ट्रप्रेमी नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.