शिर्डी : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पंढरपुरात कार्तिकी एकादशीची पूजा संपन्न झाली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी मोठं विधान केलं आहे. "येत्या आषाढी कार्तिकीला राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्रीच पांडुरंगाची शासकीय महापूजा करतील." असे मिटकरी म्हणाले.
मिटकरी पुढं म्हणाले की, "आज कार्तिक एकादशी आहे. एक वारकरी म्हणून मी महाराष्ट्रातील तमाम जनतेला आणि वारकऱ्यांना शुभेच्छा देतो. आज मी शिर्डीमध्ये आहे. याठिकाणी आमचं मंथन शिबीर सुरू आहे. पुढच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे १०० च्या वर आमदार निवडून येतील आणि अजित पवार मुख्यमंत्री होतील. राज्यातील शिंदे फडणवीस यांचे सरकार स्थिर आहे का?" असे अमोल मिटकरी म्हणाले.