सातारा : ढोल ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष, तुताऱ्यांचा रोमांच अशा उत्साहाच्या वातावरणात प्रतापगडावर शिवप्रताप दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मोठा भगवा ध्वज फडकवण्यात आला. उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले कि,राज्यात परिवर्तन झालं नसतं, तर आज शिवप्रताप दिनाला उत्साह दिसून आला नसता, पण शिवरायांच्या पुण्याईने सगळ्या गोष्टी घडल्या.
प्रतापगडावर शिवप्रतापदिनी केले. प्रतापगडावर ३६३ वा शिवप्रतापदिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवरायांची साक्ष देणारा प्रत्येक विषय राज्य सरकार पुढे नेणार असल्याची ग्वाही दिली आहे. तसेच गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.या कार्यक्रमला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेते उपस्थित आहेत.