श्रद्धाचा मारेकरी जिहादी विचारसरणीचाच!

    30-Nov-2022
Total Views |

श्रद्धा वालकर
 
 
 
 
 
 
 
नवी दिल्ली : “श्रद्धाच्या हत्येसाठी फाशी झाली तरी पश्चाताप होणार नाही. कारण, स्वर्गात अर्थात जन्नतमध्ये गेल्यावर हूर मिळणार आहेत,” हे उद्गार आहेत श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताब पूनावालाचे. ‘पॉलिग्राफीक’ चाचणीतील त्याच्या या विधानामुळे आफताब जिहादी विचारसरणीचा असल्याचे निष्पन्न झाले आहे.
 
 
 
श्रद्धा वालकर हिची हत्या करून तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे करणार्‍या आफताब पूनावालाची ‘पॉलिग्राफीक’ चाचणी मंगळवारी पूर्ण झाली आहे. येत्या काही दिवसांत त्याची ‘नार्को’ चाचणी करण्यात येणार आहे. ‘पॉलिग्राफीक’ चाचणीत आफताब याच्यावर जिहादी विचारांचा पगडा असल्याचे समोर आले आहे.
 
 
 
श्रद्धासोबत ‘लिव्ह इन’मध्ये राहत असतानाही आफताबचे तब्बल 20 मुलींसोबत प्रेमसंबंध असल्याचेही त्याने या चाचणीत सांगितले आहे.
 
 
 
आफताब ‘बंबल’ अ‍ॅपवर हिंदू मुलींना शोधून त्यांना आपल्या जाळ्यात अडकवायचा. श्रद्धाचा खून केल्यानंतर त्याने एका मानसोपचारतज्ज्ञ मुलीस घरी आणले होते. तीही हिंदू होती. श्रद्धाची अंगठी भेट देऊन त्याने तिला आपल्या जाळ्यात अडकवले. याशिवाय तो आणखी काही हिंदू मुलींच्या संपर्कात होता, अशी कबुली त्याने दिली आहे.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.