rss
सर्व रा. स्व. संघ संघटना जनजाती, इतर सामाजिकदृष्ट्या उपेक्षित समुदाय, शेतकरी, मजूर, तरुण, सामाजिक एकात्मता, विज्ञान, शिक्षण, आरोग्य, स्वावलंबी भारत, सामाजिक-आर्थिक विकास यासारख्या प्रत्येक वर्ग आणि विषयाच्या भल्यासाठी काम करतात, हे तथ्य असूनही खोटा विमर्श समाजात फैलावला जातो व राज्यघटनेचे विरोधक म्हणून दर्शविले जाते.
आपल्या राज्यघटनेच्या प्रस्तावनेत असे म्हटले आहे : आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता, निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा गांभीर्यपूर्वक निर्धार करून, आमच्या संविधान सभेत आज दि. 26 नोव्हेंबर, 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.
सांस्कृतिक असलेला देश हा इतर देशांसारखा नाही, तरीही तो सामायिक परंपरा, संस्कृती आणि मूल्यांच्या प्राचीन बंधनांनी बांधला गेला आहे. पारस्परिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि भारतासारख्या सांस्कृतिकदृष्ट्या अनोख्या देशात विविध राज्यांतील लोकांमध्ये एकतेची समृद्ध मूल्यप्रणाली सुरक्षित करण्यासाठी, जीवनाच्या विविध क्षेत्रांतील आणि जीवनशैलीतील लोकांमध्ये वाढलेल्या आणि सतत परस्पर संवादाद्वारे परस्पर संबंध मजबूत केले पाहिजे.
तथापि, ‘ब्रेकिंग इंडिया फोर्सेस’ जे स्वतःला संविधानाचे खरे समर्थक म्हणवतात ते खरेतर आपल्या महान पवित्र ग्रंथाचे सर्वात कट्टर विरोधक आहेत. त्यांनी संविधानावरील त्यांचे उघड प्रेम प्रदर्शित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विमर्श मांडले. परंतु, व्यवहारात ते आपल्या संविधानाच्या आत्म्याच्या आणि विचारांच्या विरोधात काम करतात. ते ऐक्य आणि विविधता भंग पावतील याची खात्री करण्यासाठी काम करत आहेत, ज्यासाठी त्यांनी विमर्श ‘सेट’ केले आहेत आणि ‘मेकिंग इंडिया फोर्सेस’च्या विरोधात काम करत आहेत. द्वेष इतका तीव्र आहे की, ते नक्षलवाद, दहशतवाद, असामाजिक घटक, जातीय विभाजन, धर्मांतरण आणि भ्रष्ट नेत्यांचे समर्थन करतात. त्यांच्या भारतविरोधी कृती आणि विचारधारा एक तर परदेशातून पोसल्या जातात किंवा सत्तेच्या इच्छेने चालवल्या जातात.
विकृत इतिहास, चुकीची शिक्षणपद्धती आणि एकात्मतेवर विश्वास ठेवणारी, आपल्या राज्यघटनेचा आत्मा ज्या भारताच्या प्राचीन संस्कृतीवर आधारित आहे, त्याची एकात्मता भंग करण्याचे अंतिम ध्येय असलेल्या भारताच्या मूळ कल्पनेच्या विरोधात नियमितपणे द्वेषपूर्ण कथन करणे आणि राज्यघटनेनुसार अखंडता, समानता आणि विश्वगुरू बनवणे जे संतुलित आणि तर्कशुद्ध दृष्टिकोनाने संपूर्ण जगाची काळजी घेण्यास शिकवते, त्याविरुद्ध जागतिक स्तरावर नकारात्मक भावना निर्माण करतात.
आपल्या राज्यघटनेत विविध विदेशी दस्तावेजांतून अनेक तरतुदी अंतर्भूत केल्या असल्या, तरी त्याचा आत्मा पूर्णपणे भारतीय आहे. यावरून आपल्या राज्यघटनेचे सौंदर्य, सर्वसमावेशकता दिसून येते. प्रस्तावना हेतू स्पष्ट करते, जी महान भारतीय प्राचीन संस्कृतीशी सुसंगत आहे. संविधानानुसार सामाजिक सलोखा, एकात्मता आणि अखंडतेवर विश्वास न ठेवणार्या भारत तोडणार्या शक्ती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आणि त्यांचे राज्यघटना तयार करणारे सहकारी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी जमिनीवर काम करणार्या संघटनांना उद्ध्वस्त करण्यासाठी अहोरात्र झटत आहेत, काम करत आहे. अशा विघटनकारी शक्ती म्हणूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा तिरस्कार करत असतात. संघावर जहरी टीका केली जात आहे, त्यांच्या विरोधात सतत विषारी विमर्श रचले जात आहेत, पण ते सर्व जातींना भेदभाव न करता, सर्वांना समानतेने वागवण्याच्या सामाजिक समतेच्या मंत्राला अनुसरून सर्व जातींना एकत्र आणण्याचे काम मूकपणे करत आहेत. एक महान राष्ट्र निर्माण करण्यासाठी एकता आणि अखंडता घडवून आणणे, जेणेकरून प्रत्येकजण सामाजिक, आर्थिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या मजबूत होईल.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सामाजिक प्रबोधन आणि स्वयंसेवकांच्या चारित्र्य विकासाद्वारे वैयक्तिक आणि सामूहिकरित्या पद्धतशीर बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करतो. संघाला आपल्या स्वयंसेवकांकडून काही गुणांची अपेक्षा असते : ते समाजात संघाचे ध्येय प्रभावीपणे पार पाडतील; रामसेतूपासून हिमालयापर्यंत हा देश एक आहे आणि माझा आहे, हा संपूर्ण भारताचा दृष्टिकोन तो कायम ठेवेल. समाजातील सर्व सदस्य समान आहेत, असा त्यांचा ठाम विश्वास असेल. राष्ट्राला सर्वोपरी ठेवून ते नियमितपणे शाखांना उपस्थित राहतील आणि चळवळीचे नेतृत्व करतील.
सर्व रा. स्व. संघ संघटना जनजाती, इतर सामाजिकदृष्ट्या उपेक्षित समुदाय, शेतकरी, मजूर, तरुण, सामाजिक एकात्मता, विज्ञान, शिक्षण, आरोग्य, स्वावलंबी भारत, सामाजिक-आर्थिक विकास यासारख्या प्रत्येक वर्ग आणि विषयाच्या भल्यासाठी काम करतात, हे तथ्य असूनही खोटा विमर्श समाजात फैलावला जातो व राज्यघटनेचे विरोधक म्हणून दर्शविले जाते. या विभागात सेवा भारती आणि जनजाती कल्याण आश्रम या दोन संस्थांची माहिती आहे, जिथे चांगल्या हेतूने राज्यघटनेचे पालन कसे करायचे याचे प्रात्यक्षिक आहे.
सेवा भारतीचे स्वयंसेवक सध्या देशातील दुर्गम भागात एक लाख सेवा प्रकल्पांमध्ये सहभागी आहेत. पूर, अपघात आणि भूकंप आणि सुनामी यांसारख्या इतर अनेक नैसर्गिक आपत्तींना स्वयंसेवक प्रथम प्रतिसाद देणारे आहेत. अहवालानुसार, सेवा भारतीकडे 17,500 शैक्षणिक प्रकल्प, 12 हजार आरोग्य सेवा प्रकल्प, 26 हजार समाजकल्याण प्रकल्प आणि 9,238 स्वावलंबी प्रकल्प आहेत. समाजातील आर्थिकदृष्ट्या वंचित आणि सामाजिकदृष्ट्या उपेक्षित घटकांसाठी वैद्यकीय मदत, वाचनालये, वसतिगृहे, मूलभूत शिक्षण, प्रौढ शिक्षण, व्यावसायिक आणि औद्योगिक प्रशिक्षण आणि रस्त्यावरील मुले आणि कुष्ठरोग्यांचे उत्थान हे प्रकल्प आहेत. समाजातील वंचित घटकांना त्यांच्या जीवनातील सर्व पैलूंमध्ये स्वावलंबी बनवणे हे सेवा भारतीच्या प्रकल्पांचे उद्दिष्ट आहे.
जनजाती कल्याण आश्रम
भारत हा वैविध्यपूर्ण नैसर्गिक वातावरणाचा आणि अद्वितीय सांस्कृतिक वारशाचा देश आहे. हे शेकडो जमातींचे निवासस्थान आहे, ज्यांना ‘जनजाती’देखील म्हटले जाते. आपल्या देशातील सर्व प्राचीन धर्मग्रंथ आणि साहित्यात जनजातींचा उल्लेख आढळतो. रामायणात शबरी, बळी, सुग्रीव इत्यादी अनेक संदर्भ आहेत, तर महाभारतात एकलव्य, बर्बरिक, घटोत्कच इत्यादी संदर्भ आहेत. रांची प्रदेशात बिरसा मुंडा (झारखंड राज्य), महाराष्ट्रात कान्होजी भांगरे, केरळमध्ये तलक्कल चंदू, ओडिशात विशोई, मेघालयात तिरोत सिंग, बिहारमधील संथाल नेते (सिद्दो, कानू आणि तिलका मांझी), मणिपूरची राणी गाईदिनल्यू आणि शाहिद जडोनांग. राजस्थान पुंजा भिल्ल हे स्वातंत्र्य संग्रामात सक्रिय सहभागी होते आणि इतर अनेक जमाती आहेत, ज्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला आणि ते प्रसिद्धी न मिळालेले नायक आहेत.
आपल्या देशाच्या एकूण लोकसंख्येच्या दहा टक्के जमाती आहेत आणि त्या हरियाणा, पंजाब आणि दिल्ली वगळता जवळपास सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आढळतात. ते आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेले आहेत. दुर्दैवाने, देशातील काही शहरवासीयांनी समाजाच्या या वर्गाशी पिढ्यान्पिढ्या कलंक आणि गुन्हेगारी जोडली आहे. समाजाने जनजाती आणि त्यांच्या समृद्ध संस्कृतीचा आदर करणे आवश्यक आहे. जनजाती कल्याण आश्रम सध्या 455 पैकी 361 जनजाती जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहे. एकूण 19 हजार, 398 सक्रिय प्रकल्प आहेत. मुला-मुलींसाठी अनेक शैक्षणिक केंद्रे आणि वसतिगृहे, तसेच कृषी विकास आणि कौशल्य विकास केंद्रे, बचत गट, वैद्यकीय सुविधा, ग्रामीण क्षेत्र विकास आणि असे अनेक उपक्रम आपल्या जनजाती बांधवांना मदत करण्यासाठी सुरू केले आहेत.
सरकारमधील संघ स्वयंसेवक
केशवानंद भारती खटल्यातील 13 पैकी सात न्यायमूर्तींनी, ज्यात सरन्यायाधीश सिकरी यांचा समावेश आहे, ज्यांनी सारांश विधानावर स्वाक्षरी केली, असे म्हटले की, संसदेच्या अधिकाराला अंतर्निहित मर्यादा आहेत. ‘कलम 368’ अंतर्गत संसदेला संविधानाची ‘मूलभूत रचना’ किंवा संरचनेत ‘नुकसान’, ‘निष्क्रिय’, ‘नष्ट’, ‘रद्द करणे’, ‘बदल’ करण्यासाठी आपल्या दुरुस्ती अधिकारांचा वापर करता येत नाही. ही वस्तुस्थिती असूनही, अनेक राजकीय पक्ष मोदी सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मूलभूत रचना बदलण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्रण करण्याचा प्रयत्न करतात.
सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, काही मुख्यमंत्री आणि इतर अनेक मंत्री संघाच्या पार्श्वभूमीचे आहेत आणि त्यांच्या कार्यावरून संविधानाचा आत्मा आणि विचारांचा आदर कसा करतात हे दिसून येते. अनेक योजना सर्व जाती आणि धर्मातील गरीब आणि सामाजिकदृष्ट्या उपेक्षित लोकांना लाभ देतात, ज्यात मोफत घर, सिलिंडर, अन्नधान्य, शौचालय, बँक खाती, आयुष्मान भारत योजनेद्वारे मोफत वैद्यकीय मदत आणि अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीयांसाठी विशेष योजनांचा समावेश आहे. समाज आणि देशाच्या भल्यासाठी उत्कृष्ट कार्य करणार्या खेडेगावातील, गरीब आणि जनजाती समाजातील स्वातंत्र्यलढ्यातील प्रसिद्धी न मिळालेल्या नायकांना तसेच आजच्या काळातील गोरगरीब जे समाजासाठी महान कार्य करत आहेत, त्यांना आदर आणि सन्मान दिला जात आहे.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 140व्या जयंती निमित्त पंतप्रधानांनी दि. 31 ऑक्टोबर, 2015 रोजी ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ची घोषणा केली. त्यानंतर, अर्थमंत्र्यांनी त्यांच्या 2016-17च्या अर्थसंकल्पीय भाषणात या उपक्रमाची घोषणा केली. विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची संस्कृती, परंपरा आणि प्रथा जाणून घेतल्याने राज्यांमध्ये चांगली समज आणि बंध निर्माण होतील, ज्यामुळे भारताची एकता आणि अखंडता मजबूत होईल. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ कार्यक्रमाचा उद्देश विविध भारतीय राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये राहणार्या विविध संस्कृतींच्या लोकांमध्ये परस्पर समंजसपणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सक्रियपणे संवादाला चालना देणे आहे.
कार्यक्रमानुसार दरवर्षी, भारतातील प्रत्येक राज्य/केंद्रशासित प्रदेश लोक-लोकांच्या संपर्कासाठी भारतातील दुसर्या राज्य/केंद्रशासित प्रदेशांशी जोडला जाईल. अशी आशा आहे की, या देवाणघेवाणीद्वारे विविध राज्यांच्या भाषा, संस्कृती, परंपरा आणि प्रथा यांचे ज्ञान अधिकाधिक समजूतदारपणा आणि बंध निर्माण करेल, ज्यामुळे संविधानानुसार भारताची एकता आणि अखंडता मजबूत होईल. जमिनीवरील प्रत्यक्ष कामावरून दिसून येते की, रा. स्व. संघ आणि त्यांच्या संघटना भारतविरोधी शक्तींनी मांडलेल्या कथनाऐवजी राज्यघटनेच्या आत्मा आणि हृदयानुसार काम करत आहेत.
- पंकज जयस्वाल