मुंबई ( afjal khan kabar ): छत्रपती शिवाजी महाराजांनी कोथळा बाहेर काढून नरकात धाडलेल्या क्रूरकर्म्या अफजल खानच्या कबरीचे काही लोकांकडून उद्दातीकरण सुरु आहे. प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या खानच्या कबरी भोवती दोन धर्मशाळा आणि १९ खोल्या बांधण्यात आल्या होत्या, अशी माहिती मिळते. त्याविरोधात कठोर कारवाई करून राज्यातील फडणवीस-शिंदे सरकारने अनधिकृत बांधकाम पाडले. या कारवाई विरोधातील याचिका फेटाळून सर्वोच्च न्यायालयाने राज्यसरकारची कारवाई योग्य असल्याचे स्पष्ट केले.
फडणवीस-शिंदे सरकारने गुरुवारी (१० नोव्हेंबर २०२२) अफजल खानच्या कबरी भोवती असलेल्या अनधिकृत बांधकामावर हातोडा टाकून ते नेस्तनाभूत केले. त्याविरोधात हजरत मोहोम्म्द खान मेमोरियल ट्रस्टने कोर्टात याचिका दाखल केली. आपल्या याचिकेत सरकारची कारवाई अयोग्य असल्याचा युकीत्वाद याचिकाकर्त्यांच्या वतीने करण्यात आला होता. तसेच पाडण्यात आलेले बांधकाम पुन्हा बांधले जावे असेही याचिकेत सांगण्यात आले होते,अशी माहिती मिळते.
अफजल खानच्या काबारीवरील कारवाई हि न्यायालयाच्या आदेशानेच करण्यात आलेली आहे. तसेच कारवाई करताना मुळ कबरीला धक्का लावलेला नाही, हा महत्वाचा मुद्दा सरकारी वकिलांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिला. या कारवाई बाबत सातारा जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल देखील कोर्टात सादर करण्यात आला. सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारचा अहवाल ग्राह्य धरला आणि कारवाई योग्य असल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान येत्या ३० नोव्हेंबर २०२२ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रतापगडाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यावेळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.