सरकारने खासगी मदरश्यांना हात लावल्यास देश पेटेल!

मदरश्यांतून आधुनिक शिक्षण मिळणार; मौलवीची चीडचीड

    25-Nov-2022
Total Views |
maulavi
 
 
डेहराडून : उत्तराखंड सरकारने वक्फ बोर्डाच्या अंतर्गत येणाऱ्या राज्यातील सर्व मदरशांमध्ये ड्रेस कोड आणि NCERT पुस्तके लागू करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर मौलाना साजिद रशिदी यांनी म्हटले आहे की, जर सरकारने खाजगी मदरशांना हात लावण्याची हिंमत केली तर देश पेटू लागेल.
 
 
मौलाना साजिद रशिदी म्हणाले, “प्रत्येक राज्यात एक मदरसा बोर्ड आहे जो सरकारच्या अंतर्गत काम करतो. त्या मदरशांमध्ये सरकार ड्रेस कोड लागू करू शकते. एवढेच नाही तर चित्रपट आणि गाणी देखील वाजवू शकतात. या मदरशांमध्ये सरकार वाट्टेल ते करू शकते आणि त्याबद्दल कोणीही रोखणार नाही. परंतु, सरकारला आम्ही खाजगी मदरशांमध्ये काहीही करू देणार नाही, कारण भारतीय मुस्लिम त्यांच्या ४% मुलांना खाजगी मदरशांमधून मौलवी आणि मौलाना बनवतात. जर सरकारने त्या ४% मदरशांमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तर सर्व भारतीय मुस्लिम त्याच्या विरोधात उभे राहतील आणि ते होऊ देणार नाहीत.
 
 
साजिद रशिदी पुढे म्हणाले की, “आम्ही सरकारकडून काहीही घेत नाही. काही मूर्ख लोकांनी सरकारी अनुदानासाठी आपले मदरसे सरकारला दिले आणि त्याचे परिणाम आता भोगत आहेत. त्यामुळे आमचे मौलवी आणि उलेमा मदरशांसाठी सरकारकडून एकही पैसा घेऊ नका, असा सल्ला देतात.
 
 
खरं तर, गुरुवारी (२४ नोव्हेंबर २०२२) उत्तराखंड वक्फ बोर्डाचे अध्यक्ष शादाब शम्स म्हणाले होते की वक्फ बोर्डाच्या अखत्यारीतील सर्व १०३ मदरशांचे आधुनिकीकरण केले जाईल. मदरशांमध्ये ड्रेस कोड आणि एनसीईआरटी अभ्यासक्रम लागू केला जाईल. वक्फ बोर्डाच्या अध्यक्षांनी सांगितले होते की, पहिल्या टप्प्यात ७ मदरसे आधुनिक केले जात आहेत. यामध्ये डेहराडून, उधम सिंग नगर आणि हरिद्वार येथील प्रत्येकी दोन मदरसे आणि नैनिताल जिल्ह्यातील एका मदरशाची आधुनिक शाळांच्या धर्तीवर चालवण्याची निवड करण्यात आली आहे. त्यानंतर इतर मदरशांमध्येही ही प्रणाली लागू केली जाईल.
 
 
सर्व धर्माच्या मुलांना प्रवेश दिला जाईल
 
या मदरशांमध्ये सर्व धर्माच्या मुलांना शिक्षण घेता येणार आहे. मदरशांमध्ये सकाळी ६३० ते ७.३० या वेळेत कुराणचे शिक्षण दिले जाईल. यानंतर सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत मदरसा सामान्य शाळेप्रमाणे सुरू होईल, तर दोन वाजेनंतर पुन्हा मदरसा म्हणून सुरू होईल. मदरशांची नोंदणी मदरसा बोर्डाकडे नाही, तर उत्तराखंड बोर्डाकडे केली जाईल, असाही मोठा निर्णय मदरसांबाबत घेण्यात आला आहे.
 
 
मदरशांमध्ये स्मार्ट वर्ग
 
मदरसे इंग्रजी माध्यमाच्या शाळांप्रमाणे चालवले जातील. मदरशांमध्ये स्मार्ट क्लासेस असतील जेणेकरुन मदरशांमधून उत्तीर्ण होणारी मुले डॉक्टर आणि इंजिनियर बनू शकतील. कुराण शिकविणाऱ्या मदरशांमध्ये आता आधुनिक शिक्षण दिले जाणार आहे.
 
मदरशांचे सर्वेक्षण झाल्यापासून राज्य सरकार मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. मदरशांमध्ये कोणता ड्रेस कोड असेल, रंग कोणता असेल, असा अंदाज सध्या वर्तवला जात आहे. मात्र, यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. बोर्ड सध्या यावर विचार करत आहे.
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.