एकही गाव कुठेही जाणार नाही, “बेळगाव, कारवार, निपाणीही परत मिळवू!

23 Nov 2022 12:55:29

Devendra Fadnavis





नागपूर :
सांगलीतील जत तालुक्यावर कर्नाटकातील सरकारचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दावा केल्यानंतर तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. या गावांना पाणीपुरवठा होत नसल्याने २०१२ साली ग्रामस्थांनी तसा ठराव केला होता. त्या ठरावाच्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य त्यांनी केले आहे. याला उत्तर देताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण एकही गाव महाराष्ट्राबाहेर जाऊ देणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

फडणवीस म्हणाले, "४० गावांनी २०१२मध्ये या गावांनी आम्हाला पाणी मिळत नाही, असं म्हणून ठराव केला होता. मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा कर्नाटक सरकारशी वाटाघाटी करुन आम्हाला ज्या ठिकाणी पाणी हवं तिथे देण्याचा प्रयत्न झाला होता. त्यानंतर म्हैसाळच्या सुधारित योजनेतून तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीही मान्यता दिली होती. आता या योजनेला तत्काळ मान्यता देणार आहोत. आता पाणी तिथे पोहोचणार आहे."


"सीमावादाच्या प्रश्नावरील बैठकीत अत्यंत महत्वाचे निर्णय ठरले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतललेल्या बैठकीत महाराष्ट्रातील सीमावासीयांचे जे प्रश्न असतील ते सोडविण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यामुळे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केले असावे. पण एकही गाव महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ देणार नाही. सीमाभागातील बांधवांसोबत आपण आहोत. त्यांना आणखी योजना देण्याचा प्रयत्न आपला असणार आहे. पण सर्वोच्च न्यायालयात लढून बेळगाव, कारवारसहीत आपले जे सीमाभाग आहेत. ते मिळविण्याचा आपण पूर्णप्रयत्न करणार आहोत. ही लढाई शत्रूत्वाची नाही तर कायद्याची आहे.", असेही फडणवीस म्हणाले.





Powered By Sangraha 9.0