मुंबई ( Sanjay Raut ): तुरुंगातुन बाहेर पडल्यानंतर शिवसेना नेते,खासदार संजय राऊत पुन्हा राजकारणात सक्रीय झाले आहे. भारत जोडो यात्रे दरम्यान खासदार राहुल गांधी यांनी स्वतंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अवमानकारक शब्द काढले होते,त्यावेळी संजय राऊतांनी राहुल गांधींच्या बेताल वक्तव्याने महाविकास आघाडीत फुट पडू शकते, अशा अर्थाचे संकेत दिले होते. मात्र, हि घटना ताजी असताना संजय राऊतांनी राहुल गांधी खरे मित्र आहेत, असे वक्तव्य करून त्यांनी राहुल यांच्यावर स्तुती सुमनांचा वर्षाव केला.
काय म्हणाले राऊत
राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेत आहेत. अत्यंत व्यस्त वेळा पत्रक असून सुद्धा त्यांनी फोनद्वारे माझी ( Sanjay Raut ) चौकशी केली. त्यावेळी त्यांनी मला काळजी घेण्याचा सल्ला दिला व लवकरच पुन्हा एकदा कामाला लागू असे सांगितल्याची माहिती, राऊतांना माध्यमांना दिली. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रे दरम्यान एका सभेत वीर सावरकरांचा अपमान केला. महाराष्ट्रासह देशभरातून त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला.
शिवसेना खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी यांनी देखील सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधीना बोल सुनावले होते. त्यावरून ठाकरे गट व कॉंग्रेस यांच्यात वितुष्ट निर्माण होते कि काय असे वातावरण निर्माण झाले होते.परंतु अचानक संजय राऊतांनी आपल्या तोंडची भाषाबदलून राहुल गांधी आपले मित्र असल्याचे वक्तव्य केले. त्यावेळी राऊत म्हणाले की, राहुल गांधी हे असे व्यक्तिमत्व आहेत, जे वैचारिक आणि राजकीय मतभेद असतानाही मैत्री कायम ठेवतात. भाजपमध्ये माझेही मित्र आहेत पण मी तुरुंगात गेल्याने त्यांना आनंद झाला होता, हे मुघल काळातील राजकारण आहे.
संजय राऊतांनी ( Sanjay Raut ) राहुल गांधींचे जाहीर कौतुक केल्याने ठाकरे गट आणि कॉंग्रेसमध्ये सगळ काही सुरळीत झाल्याच्या चर्चा सुरु आहेत.