मंगळुरूमध्ये रिक्षात स्फोट हे दहशतवादी कृत्य; पोलिसांचा अंदाज!

20 Nov 2022 15:24:40
 Rickshaw blast in Mangalore
 
 
मंगळुरू ( Rickshaw blast in Mangalore ) : कर्नाटकातील मंगळुरू येथे शनिवारी झालेला ऑटोरिक्षाचा स्फोट हा अपघाती नव्हता तर "गंभीर नुकसान करण्याच्या उद्देशाने केलेले दहशतवादी कृत्य होते", असे राज्य पोलीस प्रमुखांनी आज सांगितले. कर्नाटकचे सर्वोच्च पोलीस प्रवीण सूद म्हणाले की, पोलीस केंद्रीय एजन्सीसह या घटनेचा तपास करत आहेत.
 
 
एका चालत्या रिक्षामध्ये झालेल्या या स्पोटात ( Rickshaw blast in Mangalore ) २ जण जखमी झाल्याची माहिती आहे. राज्य पोलीस आणि केंद्रीय यंत्रणांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ही घटना शनिवारची (19 नोव्हेंबर 2022) आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार हा स्फोट नागौरी भागात झाला. येथे एका चालत्या ऑटोरिक्षाचा अचानक स्फोट होऊन आग लागली. कोणाला काही समजेपर्यंत २ जण भाजले होते.जखमींमध्ये ऑटोचालकाचाही समावेश आहे. मंगळुरू रेल्वे स्थानकावरील एका व्यक्तीने ऑटो चालकाला शहराच्या आत नेण्यास सांगितले होते. नंतर थोडे अंतर कापल्यानंतर अचानक स्फोट झाला.
 
 
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि एफएसएलचे पथक घटनास्थळी पोहोचले. जखमींना रुग्णालयात दाखल ( Rickshaw blast in Mangalore ) करून ऑटोचा शोध घेण्यात आला. झडतीदरम्यान प्रेशर कुकर आणि गॅस शेगडी जप्त करण्यात आली आहे. आतापर्यंतच्या तपासात स्फोटासाठी २ बॅटरी, नट-बोल्ट, काही वायरसह प्रेशर कुकर आणि गॅस बर्नर जप्त करण्यात आला आहे. ऑटोमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या ओळखपत्रावर प्रेमराज असे त्याचे नाव लिहिले आहे. स्फोटामुळे रिक्षाचालकाचे अर्धे शरीर जळाले आहे.
 
 
याप्रकरणी कंकनडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी( Rickshaw blast in Mangalore ) पोलिसांना अनेक सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहेत. एका फुटेजमध्ये ऑटो स्फोटाचा व्हिडिओ असल्याचा दावा केला जात आहे. एका रिपोर्टनुसार, ऑटोमध्ये बसलेला प्रवासी बॅग घेऊन जात होता. या स्फोटात तो प्रवासीही जखमी झाला आहे. शहर पोलिस आयुक्त एन शशी कुमार यांनी लोकांना काळजी करू नका, असे आवाहन केले. यासोबतच त्यांनी सोशल मीडिया किंवा इतर कोणत्याही माध्यमातून उडणाऱ्या अफवांकडे लक्ष देऊ नये, असेही सांगितले आहे. सुत्रानाकडून मिळालेल्या माहिती नुसार या स्फोटाचे धागे कोइम्बतुर दहशतवादी स्फोटाशी जोडले आहेत.
 
 
 
Powered By Sangraha 9.0