मुंबई ( India New Zealand T20 ) : भारत विरुद्ध न्युझीलंड यांच्यातील दुसरा टी-२० सामना बे ओव्हल येथे खेळवला गेला. या सामन्यात भारताने तब्बल ६५ धावांनी न्यूझीलंडचा धुव्वा उडवला. परंतु सामना पूर्ण होण्या आधीच भारताने एक मोठा रेकॉर्ड स्वतःच्या नावावर नोंदवून ऑस्ट्रेलियाला मागे सरले आहे.
सामन्यात नाणेफेक जिंकताच ( India New Zealand T20 ) भारतीय संघाच्या नावावर एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारत हा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आणि एका कॅलेंडर ईयरमध्ये सर्वाधिक सामने भारत खेळला. भारतीय संघ या कॅलेंडर वर्षातील आपला ६२ वा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आणि यासह भारताने एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक सामने खेळण्याचा विश्वविक्रम केला आहे.
२००९ मध्ये आस्ट्रेलियाचा संघ एका ६१ सामने खेळला होता. तो विक्रम भारतीय संघाने मोडीत काढला. भारत व ऑस्ट्रेलिया सोडल्यास इतर कोणत्याही संघाला एका कालेंडर वर्षात ६० सामने खेळता आलेले नाहीत. या पूर्वी भारताने २००७ मध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक ५५ सामने खेळले होते. यंदा भारताने ३९ टी-२० सामना खेळले आहेत. त्यापैकी २८ सामान्यांमध्ये भारताने विजय संपादित केला, १० सामन्यां मध्ये पराभवाला सामोरे जावे लागले तर एका सामना पाऊसामुळे ड्रॉ झाला.
आजच्या सामन्यात( India New Zealand T20 ) सध्या फॉर्मात असलेला भारतीय फलंदाज सुर्यकुमार यादव याने नाबाद १११ धावा केल्याने टीम इंडियाला न्यूझीलंड समोर १९२ इतका धावांचा डोंगर रचता आला. पुढे १८.५ षटकांत भारताने न्यूझीलंडच्या सर्व फलंदाजांना गुंडाळले. दीपक हुडाने न्यूझीलंडचे सर्वाधिक चार बळी घेतले. भारताच्या विजयाने या मालिकेत न्यूझीलंडवर १-० अशी आघाडी घेतली.