अयोध्या : कार्तिक नवमीच्या दिवशी अयोध्येत १४ कोसांची परिक्रमा केली जाते. श्रीरामाच्या नाम गजरात स्त्रियांच्या असंख्य टोळ्या भजनं आणि रामनाम गात अनवाणी पायानी ही परिक्रमा पूर्ण करतात. अक्षय नवमीच्या दिवशी रात्री १२ नंतर सुरु झालेली ही परिक्रमा दुसऱ्या दिवशी १० - १०:३० पर्यंत संपते.
हनुमानगढी मंदिरापासून ही यात्रा सुरु होते. मातीची पूजा करून कपाळाला माती लावून या यात्रेची सुरुवात होते. या यात्रेत यात्रेकरूंवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेरे उडवत आहेत तसेच शक्य तेवढ्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा लावले आहेत. या मार्गावरून जोडलेले सर्व रस्ते बंद करून त्याला पर्यायी रस्ते दिले गेले आहेत.