पुणे : प्रतापगडावरील अफजलखानाच्या कबरीभोवतील अतिरिक्त बांधकाम उडवल्यानंतर गडकिल्ल्यांवरील अनधिकृत मोर्चेबांधणी हटवायला सुरुवात केली आहे. आज पहाटे ५ वाजल्यापासूनच पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर झालेले स्टॉल्स वनविभागाने उडवून लावले.
कारवाई केल्यानंतर हे अनधिकृत अतिक्रमण पुन्हा होऊ नये म्हणून ५० पेक्षाही जास्त वनविभागाचे कर्मचारी व अधिकारी गडावर तैनात करण्यात आले. तसेच कायदा आणि सुव्यवस्था टिकवून ठेण्यासाठी ७ वरिष्ठ पोलीस अधिकारी किल्ल्यावर उपस्थित आहेत. या अधिकाऱ्यांच्या दिमतीला ५० पोलिसांची फौज गडावर पाठवण्यात आली आहे.
कारवाईदरम्यान नोंदणी केलेल्या ७१ तर नोंदणी न केलेल्या ६४ म्हणजे एकूण १३५ स्टॉल धारकांचे स्टॉल जमीन दोस्त केले आहेत. किल्ल्याच्या मुख्य प्रवेश द्वारावरील अतिरिक्त बांधकाम जेसीबीच्या वापर करून काढून टाकले आहे.
या घटनेचा स्थानिकांकडून विरोध होताना दिसतो. दही, लिंबू सरबत, भजी विकून आपले पोट भरणार्यांना आता अनधिकृतरित्या अतिक्रमण सिंहगडावर करता येणार नाही.