मुंबई ( Shraddha Walkar ) :महाराष्ट्रातील श्रद्धा वालकरच्या हत्येने देश पुन्हा एकदा हादरला आहे. आफताब अमीन पुनावाला या क्रूर प्रियकराने श्राद्धाची माणुसकीला काळिमा फासला आहे. प्रेम आंधळं असतं असं बऱ्याचदा म्हंटल जात. याच आंधळ्या प्रेमाने श्रद्धा वालकरचा घात केला. आफताबने तिच्या देहाचे ३५ तुकडे करून ते जंगलात फेकले. सध्या या प्रकरणातील एक महत्वाची माहिती समोर आली आहे. आफताब आणि श्रद्धा यांची मैत्री एका डेटिंग साईट द्वारे झाली होती. पुढे याच मैत्रीचे रूपांतर रिलेशनमध्ये झाले आणि आफताबने श्रद्धाचे तुकडे केले.
पोलिसांच्या तपासात आफताब अमीन पूनावालाचे आणखीन काही मुलींशी संबंध असण्याबाबत धक्कादायक तथ्य समोर आले आहे. आफताब मुलींशी संपर्क साधण्यासाठी डेटिंग अॅपचा वापर करायचा,हि गोष्ट तपासात उघड झाली आहे. त्यामुळे आफताबचे आणखी कोणत्या मुलींशी मैत्री होती हे शोधण्याचा पोलिस सध्या प्रयत्न करत आहेत.श्रद्धा वालकरची ( Shraddha Walkar ) हत्या केल्यानंतर आफताब पुन्हा डेटिंग साईटवर सक्रिय झाला होता. तसेच त्याने डेटिंगसाईट द्वारे आपले नवे सावज शोधले होते. श्रद्धाची ( Shraddha Walkar ) हत्या उघडकीस आल्यानंतर आफताब नव्या मैत्रिणीला घरी बोलावणार होता अशी माहिती मिळते. पोलीस अधिकाऱ्यांच्या वतीने दिल्या गेलेल्या माहितीनुसार आफताब जवळ जवळ ५ वर्ष डेटिंग ऍप्लिकेशनचा वापर करत होता.
या ऍपवर भेटले आफताब आणि श्रद्धा -
आफताब वारंवार पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याने त्याच्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवणे पोलिसांसाठी कठीण होत आहे. श्रध्दा ( Shraddha Walkar ) खून प्रकरणातील केस अधिक मजबूत करण्यासाठी पोलीस हत्येमागचे कारण शोधत आहेत, जेणेकरून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी. हत्येचा हेतू शोधून, लिंक जोडून पोलीस पुरावे गोळा करत आहेत. यासाठी पोलीस मानसोपचार तज्ज्ञाचीही मदत घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धा आणि आफताब यांची भेट 'बंबल' डेटिंग अॅपवर झाली होती. आफताब आणि श्रद्धा यांच्यात भांडण होण्यामागची मुख्य कारणे काय होती, हे अद्याप पोलिस तपासात स्पष्ट झालेले नाही. श्रद्धाच्या मृत्यूनंतर आफताब कोणत्या मुलींना भेटला आणि त्याच्या फ्लॅटवर कोण आले हे जाणून घेण्याचा प्रयत्न दिल्ली पोलीस करत आहेत.
सध्याच्या वेगवान जगात तरुण-तरुणींमध्ये डेटिंग साईट वापरण्याचे क्रेझ वाढले आहे. एखाद्या अनोळखी व्यक्तीला भेटायचे त्याच्या प्रेमात पडायचे याचे प्रमाण दिवसें दिवस वाढत चालले आहे. याचाच फायदा घेऊन आफताब अमीन पुनावाला सारखे नराधम अनेकांची आयुष्य उध्वस्त करतात. त्यामुळे कोणत्याही डेटिंग साईटचा वापर करताना सावधान! अन्यथा श्रद्धा वालकर ( Shraddha Walkar )सारखी आपला शेवट होऊ शकतो.