राहूल गांधी यांच्या विरोधात शिंदे गटाचे 'जोडे मारो' आंदोलन!
17-Nov-2022
Total Views |
डोंबिवली:कॉग्रेस नेते राहूल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात केलेल्या विधानामुळे कल्याण डोंबिवलीत बाळासाहेबांची शिवसेना आक्रमक झाली. बाळासाहेबांची शिवसेना या पक्षातर्फे राहूल गांधी यांच्या फोटोला जोडे मारत निषेध व्यक्त करण्यात आला. राहूल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
कॉग्रेसची राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात ‘भारत जोडो’ यात्र सुरू आहे. या यात्रेदरम्यान राहूल गांधी यांनी एका सभेमध्ये बोलताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत विधान केले आहे. त्या विधानाचे राजकीय वतरुळात पडसाद उमटलेले पाहायला मिळाले. राहूल गांधी यांच्या या विधानाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वच भाजप नेत्यांनी निषेध केला आहे. बाळासाहेबांची शिवसेना ही गुरूवारी आक्रमक झालेली दिसून आली. बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षातर्फे कल्याण मधील शिवाजी चौकात तर डोंबिवलीतील इंदिरा चौकात गुरूवारी जोडो मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी विश्वनाथ भोईर, रवी पाटील यांच्यासह कल्याण डोंबिवलीतील विविध पदाधिकारी, कार्यक र्ते उपस्थित होते.