हिंदू मुला-मुलींचे संगोपन बर्याचदा मुस्लीम मुला-मुलींच्या संगोपनाच्या विपरित झालेले असते. कोणाचा जीव घेणे तर दूरच, हाणामारी करणे, रक्त येऊस्तोवर मारण्याचाही विचार त्यांच्याकडून होत नाही. म्हणूनच आफताबने श्रद्धा वाळकरचे 35 तुकडे करण्यामागे त्याची लहानपणापासूनची जडणघडणदेखील कारणीभूत आहे.
लिव्ह इन’मध्ये राहणार्या प्रेयसीची हत्या करून तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे करणार्या आफताबविरोधात देशभरातील जागृत नागरिकांचा संताप अनावर झाल्याचे दिसते. यातला महत्त्वाचा भाग म्हणजे, हत्या करणारा आफताब अमीन मुस्लीम असून मृत तरुणी श्रद्धा वाळकर हिंदू-दलित समुदायातली आहे. यावरूनच या संपूर्ण प्रकरणाला ‘लव्ह जिहाद’ म्हटले जात असून त्या दिशेनेही तपास केला जाऊ शकतो. मात्र, हृदयाचा थरकाप उडवणार्या हत्याकांडानंतरही एरवी छोट्या-छोट्या घटनांतही जात, धर्म शोधणार्या तथाकथित पुरोगामी, धर्मनिरपेक्ष, उदारमतवाद्यांकडून तीव्र प्रतिक्रिया आलेली नाही.
इथेच घटनाक्रम नेमका उलट असता, मुलगी मुस्लीम अन् मुलगा हिंदू असता तर या टोळक्याने मोठा गहजब माजवला असता. 2018 साली जम्मू-काश्मीरमधील कठुआ बलात्कार आणि हत्याकांडाचे प्रकरण समोर आल्यानंतर स्वयंघोषित पुरोगामी, धर्मनिरपेक्ष, उदारमतवाद्यांनी हिंदू, हिंदुत्व आणि हिंदुस्थानविरोधात उभे ठाकण्याचा प्रकार केला होता. त्यातल्या कित्येकांना स्वतःचे भारतीयत्वही लज्जास्पद वाटत होते. म्हणूनच ‘आय अॅम हिंदुस्थान, आय अॅम अशेम्ड्’ लिहिलेले फलक झळकावण्याचे उद्योग त्यांनी केले होते. कठुआतील घटनेमुळे लाज वाटत असेल तर या टोळक्याला आताच्या श्रद्धा वाळकर हत्याकांड प्रकरणाचीही लाजच वाटली पाहिजे. त्यावरही त्यांनी संताप व्यक्त करत फलक झळाकावले पाहिजे आणि ‘लव्ह जिहाद’वरही बोलले पाहिजे. पण, इथेच तर खरी गोची आहे.
मुस्लीम व्यक्ती नेहमी चांगलीच असते, मुस्लीम व्यक्ती नेहमी निरागसच असते, मुस्लीम व्यक्ती नेहमी निर्दोषच असते आणि मुस्लीम व्यक्ती चुकीचे काम करूच शकत नाही, मुस्लीम व्यक्ती गुन्हेगार असूच शकत नाही, असे गोड समज या लोकांच्या मनात तयार झालेले आहेत. म्हणूनच आतापर्यंत मुस्लीम प्रियकराने हिंदू प्रेयसीची हत्या केल्याच्या डझनावारी घटना समोर आल्या, कोण्या मुस्लीम प्रियकराने हिंदू प्रेयसीला मारुन सुटकेसमध्ये कोंबले, कोण्या मुस्लीम प्रियकराने हिंदू प्रेयसीला मारून घरातच पुरले, कोण्या मुस्लीम प्रियकराने हिंदू प्रेयसीला मारून जाळून टाकले वा कोण्या मुस्लीम प्रियकराने हिंदू प्रेयसीला मारून तिचे 35 तुकडे केले, तरी तथाकथित पुरोगामी, धर्मनिरपेक्ष, उदारमतवाद्यांना त्याचे सोयर-सुतक नसते, तिथे त्यांची दातखीळ बसते. इथेच या टोळक्याचा दुटप्पीपणा उघडा पडतो व त्यांचा विरोध फक्त हिंदूंना असल्याचे स्पष्ट होते.
इथे पुरोगामी, धर्मनिरपेक्ष, उदारमतवादी म्हणवल्या जाणार्यांबरोबरच काँग्रेस, डावे, समाजवादी आणि चंद्रशेखर रावणसारख्या दलित राजकारण्यांचा ढोंगीपणाही दिसून येतो. हाथरसमधील बलात्कार प्रकरणानंतर या राजकीय पक्षांनी, राहुल-प्रियांका गांधी वगैरेंनी गदारोळ माजवला होता. उत्तर प्रदेशात आणीबाणीची परिस्थिती असून तिथे राष्ट्रपती राजवट लावावी असे त्यांचे म्हणणे होते. तसेच, सातत्याने पीडितेच्या जातीचा उल्लेख करून स्वतःला दलितांचे मसिहा म्हणून पेश करण्याचाही त्यांचा उद्देश होता. पण, आताच्या श्रद्धा वाळकर हत्याप्रकरणात त्यांच्या तोंडातून शब्दही फुटत नाही. कारण, श्रद्धा दलित असली तरी तिला मारणारा आरोपी मुस्लीम आहे. त्याविरोधात बोललो तर मुस्लीम मतपेटी दुरावण्याचा धोका त्यांना वाटतो. म्हणजेच, हिंदू-दलितांवर मुस्लिमांनी अन्याय-अत्याचार केला तरी चालेल, त्याला आमची मूकसंमतीच असेल, असा व्यवहार काँग्रेसी, डाव्यांकडून सुरू असतो. श्रद्धा वाळकर हत्याप्रकरणातील त्यांचे मौन हेच सांगते.
पुढचा मुद्दा म्हणजे, श्रद्धा वाळकर हत्याप्रकरणातला धक्कादायक भाग म्हणून तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे करण्याच्या प्रकाराकडे पाहिले जाते. सर्वसामान्य हिंदू व्यक्तीला त्या प्रकाराच्या उल्लेखानेही भडभडून येऊ शकते, तरी आफताबने तसे कसे केले असेल? तर त्याची मुळे मुस्लीम व्यक्तीच्या संगोपनापर्यंत जातात आणि उल्लेखनीय म्हणजे ही बाब एका मुस्लीम सामाजिक-राजकीय विश्लेषकानेच सांगितलेली आहे. डॉ. सय्यद रिझवान अहमद यांनी यामागची मुस्लीम मानसिकता सांगितली असून त्यांच्या मते, “सर्वसामान्य मुस्लीम कुटुंबात लहानपणापासूनच घरात अगदी प्रेमाने सांभाळल्या जाणार्या बकरी वा कोंबड्यांचाही एक ना एक दिवस बळी देण्याचा प्रकार होतच असतो.
म्हणजे, एखाद्या हालत्या-चालत्या जीवाला डोळ्यादेखत कापून टाकण्याचे काम बहुसंख्य मुस्लीम कुटुंबात सुरूच असते व ते लहानपणापासून त्या घरातली मुले-मुलीही पाहात असतातच. त्यातूनच त्यांच्या मनातली जीव घेण्याची भीती लोप पावत असते व त्यातल्या कोणी ‘लव्ह जिहाद’ केला, तर प्रेयसीला संपवायला, तिचे तुकडे तुकडे करायलाही ते मागे पुढे पाहात नाहीत.” हिंदू मुलींना नेमका हाच प्रकार समजत नाही. कारण, हिंदू मुला-मुलींचे संगोपन बर्याचदा मुस्लीम मुला-मुलींच्या संगोपनाच्या विपरित झालेले असते. कोणाचा जीव घेणे तर दूरच, हाणामारी करणे, रक्त येऊस्तोवर मारण्याचाही विचार त्यांच्याकडून होत नाही. म्हणूनच आफताबने श्रद्धा वाळकरचे 35 तुकडे करण्यामागे त्याची लहानपणापासूनची जडणघडणदेखील कारणीभूत आहे.
श्रद्धा वाळकरची तर हत्या झालीच, पण असा शेवट अन्य हिंदू मुलींच्या वाट्याला येणारच नाही असे नव्हे. तसे होऊ द्यायचे नसेल तर हिंदू मुलींच्या आई-वडिलांनीच पुढाकार घेतला पाहिजे. तारुण्यात पदार्पण करणार्या मुलींना आई-वडिलांनी मुस्लीम मुलांशी मैत्री केल्यामुळे होणार्या नुकसानाची माहिती दिली पाहिजे. त्यात मुस्लीम धर्म, संस्कृती, विचार करण्याची पद्धती वेगळी असल्याचे सांगतानाच ‘समान नागरी कायदा’ नसल्याने मुस्लीम वैयक्तिक कायद्यांमुळे समोर उद्भवणारा धोकाही विस्ताराने सांगितला पाहिजे. मुस्लीम मुलाला एकापेक्षा अधिक बायका करण्याचा, दोनपेक्षा अधिक मुले पैदा करण्याचा, बायकांना संपत्तीत पुरेसा वाटा न देण्याचा अधिकार मिळालेला आहे, हे हिंदू आई-वडिलांनी आपल्या मुलींना सांगितले पाहिजे. महत्त्वाचे म्हणजे हे सांगतानाच आतापर्यंतच्या ‘लव्ह जिहाद’च्या, त्यामुळे जीव गमावलेल्या मुलींची कथा अन् व्यथाही सांगितली पाहिजे. त्यातून समज आलेली हिंदू मुलगी या जाळ्यात अडकण्याची शक्यता नसेल.