अबू आझमींच्या निकटवर्तीयांवर आयकर विभागाचे छापे!

    15-Nov-2022
Total Views |
abu azami
मुंबई : देशभरात भ्रष्टाचारा विरोधात जोरदार आघाडी उघडली असताना समाजवादी पक्षाचे नेते अबू आजमी आयकर विभागाच्या रडारवर आले आहेत. आयकर विभागाने मंगळवारी (15 नोव्हेंबर) समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांचे निकटवर्तीय गणेश गुप्ता आणि त्यांची पत्नी आभा गुप्ता यांच्या जवळपास २० ठिकाणांवर छापे टाकले. बेहिशेबी मालमत्तांच्या संदर्भात हा छापा पडल्याचा सूत्रांचा दावा आहे. अबू आझमी महाराष्ट्रात समाजवादी पक्षाचे अध्यक्ष असताना गणेश गुप्ता हे समाजवादी पक्षाचे सचिव होते.
 
अबू आझमी यांचे कार्यालय असलेल्या कमल मॅन्शनमध्ये हा छापा टाकण्यात आला आहे. हे छापे मुंबई, वाराणसी, कानपूर, दिल्ली, कोलकाता आणि लखनौ येथे सुरू आहेत. विनायक निर्मल लिमिटेडवरही आयकर विभागाने छापा टाकला आहे. ही वाराणसी येथील एक कंपनी आहे जिथे आभा गुप्ता यांनी मोठ्या प्रमाणात अवैध मालमत्ता निर्माण केल्याचा आरोप आहे.
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.