प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी घेतली संभाजी भिडे गुरुजी यांची भेट!
13 Nov 2022 19:05:05
सांगली:भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगली येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचे संस्थापक व प्रमुख संभाजी भिडे गुरुजी यांची भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली.
रविवारी प्रदेशाध्यक्ष श्री बावनकुळे हे संघटनात्मक सांगली जिल्हा दौरा होते. यावेळी सायंकाळी 5.00 वा. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्या ‘दत्त निवास’ येथे भेट घेतली. यावेळी दोघांनी विविध विषयांवर चर्चा केली. त्यापूर्वी भिडे गुरुजींने श्री बावनकुळे यांचे शाल व श्रीफळ देत स्वागत केले.
भेटीनंतर श्री बावनकुळे यांनी संभाजी भिडे गुरुजीच्या साधेपणासह त्यांच्या विनम्रतेची प्रशंसा केली. त्यांनी केलेले मार्गदर्शन हे मोलाचे असल्याचे मत व्यक्त करीत ही भेट अविस्मरणीय असल्याचे सांगितले. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, जिल्हाध्यक्ष ग्रामीण पृथ्वीराजबाबा देशमुख, शहरअध्यक्ष दीपकबाबा शिंदे , प्रदेश सदस्य शेखर इनामदार, निताताई केळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.