हर हर महादेव विरोधात राडा पण सुबोध भावे गप्प का?

10 Nov 2022 11:11:23
Har Har Mahadev
 
 
 
मुंबई ( Har Har Mahadev ): लायकी नसलेल्यांच्या हाती आपण देश उभारणीचे काम दिले आहे, अशी वक्तव्य करणाऱ्या अभिनेते सुबोध भावे यांनी हरहर महादेव सिनेमाच्या बंद पडलेल्या खेळावर मौन बाळगणे पसंत केले आहे. राष्ट्रवादी पक्षाचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अभिनेता सुबोध भावेने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारलेला 'हर हर महादेव' या सिनेमाचा खेळ बंद पडण्याचा प्रयत्न केला. ठाण्यातील व्हीव्हीआना मॉल येथील चित्रपटगृहात आव्हाडांनी आपल्या गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांसोबत प्रवेश करून चित्रपट ऐन रंगात आलेला असताना राडा घातला. त्यावेळी आव्हाडांच्या कार्यकर्त्यांनी एका प्रेक्षकाला देखील मारहाण केल्याची माहिती मिळते.
 
 
अभिजित देशपांडे दिग्दर्शित 'हर हर महादेव' ( Har Har Mahadev ) या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून हिरवा कंदील मिळालेला असताना देखील आव्हाडांनी संविधान विरोधी कृत्य करन चित्रपट बंद पडला. त्यानंतर मनसेचे डॅशिंग नेते अविनाश जाधव यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत व्हिव्हिआनामध्ये प्रवेश करून 'हर हर महादेव' चित्रपटाचा खेळ पुन्हा सुरु केला.
 
 
मात्र, यासगळ्या घडामोडी सुरु असताना अभिनेता सुबोध भावेने सोईस्कर मौन बाळगले. अभिनेता सुबोध भावे हा स्वतःला शिवसैनिक म्हणवून घेतो. परंतु,त्याचा चित्रपट अडचणीत सापडला असताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शांत होते. अखेर कलाकारांच्या पाठीशी खंबीर उभे राहणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे 'हर हर महादेव' ( Har Har Mahadev ) चित्रपट आणि अभिजित देशपांडेंच्या मदतीला धावून आले. झेंडा चित्रपटात एक नकारात्मक पात्र रंगवण्यात आले होते आणि त्याची देहबोली राज ठाकरेंसारखी दाखवली होती. त्यावेळी माझे नकारात्मक चित्र रंगवून मराठी चित्रपट चालत असतील तर त्याला आपली हरकत नाही अश्या अर्थाचे वक्तव्य करून राज ठाकरे यांनी मनाचा मोठेपणा दाखवला होता.
 
 
अभिनेता सुबोध भावे राजकारण अभिव्यक्ती यावर नेहमीच भूमिका घेत असतो मात्र हरहर महादेव ( Har Har Mahadev ) चित्रपटाच्या प्रकरणात त्याने दिग्दर्शक अभिजित देशपांडे याना एकटे का पडले असा प्रश्न उपस्थित होतो. सुबोधच्या गप्प राहण्यापाठी मागे कोणते कारण दडलेले आहे कि तो सिलेक्टिव्ह भूमिका घेतो, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. सोबतच राहुल गांधींची मुलाखत घेणाऱ्या भावेंची भूमिका असणाऱ्या चित्रपटाच्या पाठीशी कोणताही काँग्रेसी वा ठाकरे गटाच्या शिवसेनेचा नेता उभा राहिला नाही, हे सुद्धा नक्कीच खटकणारे आहे.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0