नवी दिल्ली ( aam aadmi party ) : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर जाहिरातींवर करोडो रुपये खर्च केल्याचा आरोप आहे. याचे पुरावे आरटीआयसह इतर माध्यमातूनही समोर येत आहेत. पंजाबच्या आप सरकारवरही असाच आरोप करण्यात आला आहे. सोशल मीडियावर भाजप नेते व सामान्य युजर्स पंजाब सरकारने जाहिरातींसाठी २ कोटी २७ लाख रुपये उडवल्याचा आरोप करत आहेत. विशेष म्हणजे हा खर्च फक्त एका महिन्यांचा असून गुजरात निवडणुकांना टार्गेट करण्याच्या दृष्टीने जनतेचा पैसा उधळण्यात आलेला आहे.
भाजप आयटी सेलचे प्रभारी अमित मालवीय यांनी भगवंत मान ( aam aadmi party )यांच्या नेतृत्वाखालील आप सरकारवर तिथल्या लोकांच्या पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप केला आणि ते म्हणाले, "गेल्या एका महिन्यात, AAP (आप) संचालित पंजाब सरकारने फेसबुकवर २.२७ रुपये खर्च केले आहेत. यापैकी १.५८ कोटी रुपये, म्हणजे सुमारे ६९% पैसे गुजरातला निवडणुकीच्या जाहिरातीसाठी खर्च केले गेले आहेत. पंजाबमधील जनता केजरीवाल यांच्या गुजरात निवडणुकीसाठी पैसे का देत आहेत? हा सरकारी निधीचा उघड दुरुपयोग आहे. अमित मालवीय यांच्या शिवाय अनेकांनी या विरोधात आपला धारेवर धरले आहे. त्यासंबंधी सोशल मीडियावर अशा हजारो पोस्ट आणि ट्विटचा महापूर आलेला आहे.