सनातन धर्म बाहेरून भारतात आला; आप नेत्याची मुक्ताफळे!

    31-Oct-2022
Total Views |
aqueel khan


नवी दिल्ली ( Aqeel Khan ) : अरविंद केजरीवालांचा आम आदमी पक्ष व आपच्या नेत्यांच्या हिंदुत्व विरोधी कारवाया काही नवीन नाहीत. केजरीवाल सरकारमध्ये मंत्री असलेले राजेंद्र पाल गौतम ५ ऑक्टोबर २०२२ रोजी दिल्लीत आयोजित धर्मांतरण कार्यक्रमात सहभागी झाले होते. यामध्ये १० हजार हिंदूंचे बौद्ध धर्मात धर्मांतर करण्यात आले. ही घटना ताजी असतानाच केजरीवालांचे निकटवर्तीय अशी ओळख असलेल्या अकील खानने एका टीव्ही चर्चे दरम्यान सनातन धर्माविषयी वादग्रस्त टिपणी केली आहे.
 
अकील खान ( Aqeel Khan )टीव्हीवरील चर्चेदरम्यान म्हणाला कि, "सनातन धर्माचे लोक बाहेरून आले आहेत यात शंका नाही, या लोकांनी येथे येऊन आपली भारतीय संस्कृती नष्ट केली आहे." व्हिडिओमध्ये, 4:32 आणि 4:46 दरम्यान, तुम्ही अकीलला असे म्हणताना ऐकू शकता, “केवळ द्रविड हा भारताचा मूळ आहे, बाकीचे सगळे बाहेरून इथे आले आहेत. ही ऐतिहासिक वस्तुस्थिती आहे, याबद्दल कुणालाही शंका नाही. सनातन धर्माचे लोक बाहेरून आले आहेत, सर्व प्रकारचे लोक बाहेरून आले आहेत. या लोकांनी भारतात येऊन आपली संस्कृती नष्ट केली आहे.
 
समान नागरी कायदा (यूसीसी) या विषयावरील चर्चेदरम्यान खान ( Aqeel Khan ) याने ही माहिती दिली. गुजरातमध्ये यूसीसी लागू करण्यासाठी भाजप सरकारने अलीकडेच एक समिती स्थापन केली आहे. यादरम्यान खान यांनी अँकरला बोलण्यापासून रोखण्याचाही प्रयत्न केला. यावर अँकरने त्याला फटकारले.
 
कोण आहे अकिल खान
अकील खान ( Aqeel Khan ) हे आपचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे निकटवर्तीय मानला जातो. टीव्ही चॅनेल्सच्या चर्चेत ते आम आदमी पार्टीची बाजू घेताना दिसतात. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद जय हिंद यांनीही त्यांच्या ट्विटर हँडलवर अकील खानची व्हिडिओ क्लिपिंग शेअर केली आहे. त्यांनी लिहिले, “आम आदमी पार्टीचे संस्थापक नेते अरविंद केजरीवाल यांचे निकटवर्तीय अकील खान म्हणतात की सनातन धर्म भारताबाहेरून आला आहे. भारत ही सनातन आणि हिंदूंची भूमी मानली जात आहे, पण आप हिंदू बाहेरचे असल्याचे सांगत आहे.
 
हिंदू विरोधी शपथ
केजरीवाल सरकारमध्ये मंत्री असलेले राजेंद्र पाल गौतम ५ ऑक्टोबर २०२२ रोजी दिल्लीत आयोजित धर्मांतरण कार्यक्रमात सहभागी झाले होते. यामध्ये 10 हजार हिंदूंचे बौद्ध धर्मात धर्मांतर करण्यात आले. कार्यक्रमात गौतमसह अनेकांना शपथ घेताना दाखवण्यात आले. शपथेमध्ये असे म्हटले जात होते की, “मी हिंदू धर्मातील ब्रह्मा, विष्णू, महेश, श्री राम आणि श्रीकृष्ण या देवदेवतांना मानणार नाही किंवा त्यांची पूजा करणार नाही. देवाचे अवतार मानल्या जाणार्‍या राम आणि कृष्णावर माझा अजिबात विश्वास नाही. याशिवाय गुजरातच्या आप अध्यक्षांनी भगवान कृष्णाची तुलना राक्षसांशी केली होती.