इंदिरा गांधींनी नाक दाबले मात्र,संघ स्वयं सेवक चिखलात उतरून काम करत होते!

    31-Oct-2022
Total Views |
Machhu dam disaster 1979
 
 
नवी दिल्ली ( Machhu dam disaster 1979 ) : गुजरातमधील मोरबी येथील घटनेने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. हा पूल तुटल्याने जवळपास १४१ जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. २०० हून अधिक बेपत्ता होते. मोरबीत एवढं मोठं संकट येण्याची ही पहिलीच वेळ नाही. ४३ वर्षांपूर्वी ११ ऑगस्ट १९७९ रोजी अशीच घटना घडली होती. त्याकाळी मच्छू धरण फुटी मुळे संपूर्ण शहर उध्वस्थ झाले होते. अवघ्या पंधरा मिनिटात धरण क्षेत्रा लगतचा परिसर पाण्याखाली बुडाला. त्या घटनेत हजारो लोक मारले गेले. पूर ओसरल्यावर सगळीकडे नुसता मृतदेहांचा खच पडला होता.
 
 
या घटनेबाबत बोलताना पीएम मोदींनी मागे एकदा सांगितले होते की, ११ ऑगस्ट १९७९ रोजी सलग तीन दिवस पडलेल्या पावसामुळे मच्छू नदीचा बांध फुटला ( Machhu dam disaster 1979 ) आणि मोठा विध्वंस झाला. २०१७ च्या निवडणुकीत त्यांनी या घटनेची आठवण करून दिली होती. "इंदिरा गांधी पाहणी दौऱ्यावर आल्या असता त्यांनी आपले नाकावर रुमाल धरला मात्र त्यावेळी राष्ट्रीय स्वयं सेवक संघाचे कार्यकर्ते चिखलात घुसून लोकांना मदत करत होते, अशी आठवण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितली होती.
 
 
३० ऑक्टोबर २०२२ रोजी मोरबी येथील १४० वर्षे जुना पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर ४३ वर्षांपूर्वीची एक घटना ( Machhu dam disaster 1979 ) लोकांना पुन्हा एकदा आठवत आहे. या परिसरातून पाणी बाहेर आल्यावर तेथील दृश्य वेदनादायी होते, असे सांगितले जाते. खांबावर केवळ घरातील सामानच टांगलेले नव्हते, तर त्यांच्यासोबत माणसांचे आणि प्राण्यांचे मृतदेहही लटकले होते. सर्वत्र दुर्गंधी पसरली होती. कुठे माणसांचे मृतदेह कुजत होते तर कुठे जनावरांचे.
 
 
जे पथक मदतकार्यात सहभागी होऊन परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करत होते, त्यांनाही नंतर आजाराला बळी पडावे लागल्याचे दिसून आले. पुढे अनेक दिवस त्यांच्या अंगात वेदना होत असल्याच्या तक्रारी काहींनी केल्या होत्या,अशी माहिती मिळते. असे म्हणतात, मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यावर संपूर्ण मोरबीचे रुपांतर एखाद्या स्मशानभूमीत झाले होते.
 
 
एका अहवालानुसार, ( Machhu dam disaster 1979 ) त्या अपघातात १४३९ लोक आणि १२,८४९ जनावरे मरण पावली. त्याचबरोबर या दुर्घटनेत १८०० ते २५००० लोकांना आपला जीव गमवावा लागला असून धरण कोसळल्यामुळे सुमारे १०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा विकिपीडियाने केला आहे. जुनी छायाचित्रे पाहता अवघ्या १५ मिनिटांत पाण्याच्या प्रवाहाने संपूर्ण विनाश कसा केला हे स्पष्ट होते. लोकांना सावरण्याची संधीही मिळाली नाही. प्रवाह इतका जोरात होता की तिथे असलेल्या सगळ्या गोष्टी उध्वस्थ झाल्या.
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.