मुंबई : जेष्ठ पत्रकार योगिता साळवी यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या आहेत. त्याप्रकरणी चेंबूर परिसरातील टिळक नगर पोलीस चौकी येथे साळवी यांनी एफआयआर दाखल केली आहे. गेल्या काही दिवसांपासून साळवी या रुपाली चंदनशिवे हत्याप्रकरणी सत्य उजेडात यावे यादृष्टीने वार्तांकन करत होत्या. याप्रकरणात गप्प राहण्यासाठी साळवी यांच्यावर दबाव टाकण्यात येत आहे.
रुपाली चंदनशिवे हत्या प्रकरण
बुरखा घालत नाही, धार्मिक रीतीरिवाज पाळत नाही, या रागातून इक्बाल शेख (वय-३६) या इसमाने आपली पत्नी रुपाली चंदनशिवे (वय-२३) हिची अत्यंत क्रूरपणे गळा चिरून हत्या केली. रुपालीने व इक्बाल यांचा अंतरधर्मीय विवाह असून त्यांना एक मुलगा आहे. इक्बाल आपल्या पत्नीला अमानुषपणे मारहाण करत असे. तसेच तिने बुरखा घालून मान खाली घालून वागावे व निमूटपणे धार्मिक रीतीरिवाज पाळावेत यासाठी इक्बाल व त्याचे कुटुंबीय रुपलीवर दबाव टाकायचे.
इक्बाल व त्याच्या कुटुंबियांकडून होत असलेल्या मानसिक छळाला वैतागून रुपालीने घटस्पोट घेऊन विभक्त होण्याचा निर्णुय घेतला. परंतु त्यामुळे इक्बालचा पुरुषी अहंकार दुखावला आणि त्याने रूपालीचा काटा काढायचा निर्णय घेतला आणि २६ सप्टेंबर २०२२ रोजी दिवसा ढवळ्या इक्बालने रूपालीचा धारधार चाकूने गळा चिरला. त्यानंतर पोलिसांनी इक्बालच्या मुसक्या आवळ्या आणि त्याला बेड्या ठोकल्या. परंतु या प्रकरणात काही तरी काळंबेर दडलेलं असण्याचा संशय योगिता साळवी यांनी आला. त्यातून वार्तांकन करण्यासाठी रुपालीच्या घरी गेले असता योगिता साळवी त्यांना धमकावण्यात आले.