एअरबस प्रकल्प गेला तेव्हा मुख्यमंत्री कोण होते? याचा विचार आदित्य ठाकरेंनी करावा!
उदय सामंत यांचा युवराजांना टोला
28-Oct-2022
Total Views |
मुंबई : एअरबस प्रकल्प वादंगावर मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली. "स्वतः सरकारमध्ये असताना काहीही करायचं नाही आणि आपल्या अपयशाचं खापर इतरांवर फोडायचं असा प्रकार आत्ताचे विरोधक करत आहेत. काहीही न करण्यापेक्षा त्यांचा सुरू असलेला विरोध हा चांगलाच आहे. पुढील २५ वर्षे हा विरोध कायम रहावा, अशी मी त्यांना शुभेच्छा देतो, असा सणसणीत टोला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी लगावला आहे. टाटा एअरबस हा प्रकल्प गुजरातला गेल्यावरुन मविआतर्फे सुरू असलेल्या टीकेला त्यांनी उत्तर दिलं आहे.
रायगडमध्ये येणार नवा प्रकल्प!
इंडियन पल्प पेपर प्रायव्हेट लिमिटेड हा रायगडमध्ये २० हजार कोटींचा प्रकल्प येऊ घातला असून त्याचा एमओयू आठ महिन्यांपूर्वी झाला होता. मात्र, त्यानंतर कॅबिनेट सब कमिटीची बैठक जी तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात होणे अपेक्षित होते. मात्र, ती होऊ शकली नाही. यावरुन त्यांची महाराष्ट्रात उद्योग आणण्याची मानसिकता किती होती ही गोष्ट लक्षात येईल. उद्योजक महाराष्ट्रात येण्यासाठी लागणाऱ्या बैठका आणि परवानग्याच तेव्हा दिलेल्या नव्हत्या आणि आत्ता त्यांच्याच काळात गेलेल्या प्रकल्पावरुन कसा आकांडतांडव सुरू आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
विरोधकांकडून युवकांची दिशाभूल
काही लोकांच्या ट्विट्सवरुन जर शहानिशा न करता टीका केली जात आहे हे चिंताजनक आहे, असे म्हणत त्यांनी नाव न घेता आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाईंना टोला लगावला आहे. राजकीय फायद्यासाठी विरोधकांकडून युवकांची दिशाभूल सुरू आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. एखाद्या गोष्टीची शहानिशा न करता जर का मीडिया आणि नेतेमंडळी विश्वास ठेवणार असतील तर हे चिंताजनकच आहे.
जयंत पाटलांचं कौतूक! आदित्य ठाकरेंना टोला
"राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एका वृत्तवाहिनीवर प्रतिक्रीया देत असताना सांगितलं की जर कुठला प्रकल्प अशा पद्धतने जात असेल तर तो का गेला याचा विचार व्हायला हवा, मला वाटतं ही भूमिका परिपक्व राजकारण्याची आहे. युवकांची दिशाभूल करुन राजकीय फायदा उचलण्यापेक्षा एकत्र येऊन कुठले प्रकल्प महाराष्ट्रात येऊ शकतात याचा विचार करायला हवा, असे म्हणत त्यांनी आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई यांना टोला लगावला आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.