आदित्य ठाकरेंना पप्पू म्हणणं म्हणजे पप्पू शब्दाचा अपमान

28 Oct 2022 15:46:17

Kirit Sommaiya




मुंबई :
मंत्री अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरेंचा उल्लेख छोटा पप्पू केल्यानंतर आता किरीट सोमय्यांनीही याबद्दल प्रतिक्रीया दिली आहे. भाजप प्रदेश कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे उत्तर दिले आहे. "आदित्य ठाकरेच काय कुणालाही पप्पू बोलणं योग्य नाही. आदित्य ठाकरे पप्पू नाहीत तर ते फार हुशार आहेत. त्यांनी एकाबाजूला पर्यावरण मंत्रीपद सांभाळलं तर दुसऱ्या बाजूला अस्लमभाई (आमदार अस्लम शेख) यांना सीआरझेड नियमावलीचं उल्लंघन करु दिलं.", असा घणाघात त्यांनी युवराजांवर केला आहे.


"मढमध्ये हजार कोटींचा स्टुडिओ उभा केला. एकाबाजूला पर्यावरणाची काळजी दाखविली आणि त्यांच्याच सरकारच्या काळात मंत्री असलेल्या अनिल परबांना बेकायदा रिसॉर्ट बांधू दिलं, त्यामुळे आदित्य ठाकरे हे पप्पू बिलकूल नाहीत. ते अतिशय हुशार आहेत. त्यांना पप्पू म्हणणं हा पप्पू या शब्दाचा अवमान आहे," असे म्हणत आदित्य ठाकरेंचाही त्यांनी समाचार घेतला.




Powered By Sangraha 9.0