वाड्यात मांगाठणे येथे रंगल्या रेड्यांच्या झुंजी!

27 Oct 2022 14:33:47
bull


वाडा
: वाडा तालुक्यातील मांगाठणे येथे २६ ऑक्टोबर रोजी रेड्यांच्या झुंजीचे आयोजन करण्यात आले होते. या झुंजी स्पर्धेत पालघर व ठाणे जिल्ह्यातील १९ रेड्यांच्या मालकांनी सहभाग घेतला होता.या रेड्यांच्या झुंजींना सात दशकांची परंपरा असुन येथे कुठलाही अनुचित प्रकार कधीही घडला नसल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.

शेतकरी बांधव वर्षंभर आपल्या शेतात घाम गाळत काबाड - कष्ट करत असतो. दिवाळी या सणामध्ये त्यांच्या आनंदात भर पडावी या प्रामाणिक हेतूने झुंजींचे आयोजन करत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या झुंजींचा आनंद घेण्यासाठी ठाणे व पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधव हजारोंच्या संख्येने येथे उपस्थित असतात.


या झुंजी स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वच रेड्यांच्या मालकांना शाल, श्रीफल,आकर्षक चषक व ५ हजार रुपये रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले असल्याची माहीती जितेश पाटील व हितेश पाटील यांनी दिली.


या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वच रेड्यांच्या मालकांचा यथोचित सन्मान करण्यात आला. या झुंजी शांततेत पार पडल्या असुन शेतक-यांनी या झुंजींचा मनमुराद आनंद घेतला.


या रेड्यांच्या झुंजी स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी अजित पाटील,सचिन पाटील,सुनील पाटील, हेमंत पाटील, विजय पाटील, बापू पाटील,वसंत पाटील, सुरेश पाटील,नंदू पाटील, संजय पाटील,रुपेश पाटील, गणेश पाटील, योगेश खंडागळे आदींनी विशेष परिश्रम घेतले.अशाप्रकारे रेड्यांच्या झुंजी स्पर्धा उत्तमरितीने पार पडली .


|
Powered By Sangraha 9.0