टॉप २५० चित्रपटांच्या यादीत कांताराचे स्थान अव्व्ल!
27 Oct 2022 12:56:05
मुंबई : मनोरंजन क्षेत्रात वरचढ ठरत चाललेली दाक्षिणात्य चित्रपटसुष्टी एका मागे एक हिट सिनेमे घेऊन येत आहे. तर त्यामानाने बॉलिवूडचे चित्रपट फारशी कामे करत नसल्याचे दिसून येत आहे. ३० सप्टेंबर रोजी चित्रपट गृहात प्रसिद्ध झालेल्या ऋषभ शेट्टी दिग्दर्शित 'कांतारा' चित्रपटाने मोठ्या प्रमाणात यश संपादन केले आहे. ऑकटोबर महिना अखेर जवळ आली तरी प्रेक्षकांचा दणदणीत प्रतिसाद कांताराला मिळताना दिसतो.
IMDb द्वारे एकत्रित केलेल्या भारतातील सध्याच्या टॉप २५० चित्रपटांच्या यादीत कांताराने वरचे स्थान पटकावले आहे. तसेच IMDb ने या चित्रपटाला ८.६ रेटिंग दिले आहे. कांताराने बॉक्स ऑफिसवर आजपर्यंत २७ दिवसांत चांगली कामगिरी केली असल्याचे समोर येते. तस्वेच तब्ब्ल 184.80 कोटी रुपये कमावल्याचे समजते.
‘कांतारा’ ने १९९३ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'रामायण : द लिजेंड ऑफ प्रिन्स रामा' तसेच आर माधवनचा चित्रपट 'रॉकेट्री : द नांबी इफेक्ट', कमल हसनचा २००३ मधील चित्रपट 'अंबे शिवम' आणि १९८७ मधील मणिरत्नम यांनी दिग्दर्शित केलेला 'नायकन' चित्रपट, या सर्व चित्रपटांना मागे टाकले आहे. आपली संस्कृती दाखवणारे हे चित्रपट प्रथितयश बॉलिवूड चित्रपटांनाही मागे टाकत समाजमनात आपले वर्चस्व प्रस्थापित करताना दिसत आहेत.