ट्विटर यूजर म्हणे अभिषेक बच्चन बेरोजगार ! अभिषेक बच्चनने दिले सणसणीत उत्तर

24 Oct 2022 14:53:42
 
abhishek
 
मुंबई : प्रख्यात अभिनेता अमिताभ बच्चन यांचा मुलगा व सर्वांची लाडकी अभिनेत्री ऐश्वर्या रायचा जीवनसाथी अभिनेता अभिषेक बच्चन सतत समाज माध्यमांवर ट्रोल होत असतो. अभिषेक बच्चनने केलेले सिनेमे बॉक्स ऑफिसवर फार चालत नाहीत म्हणून त्याची खिल्ली उडवली जाते. यावर अभिषेक म्हणाला बुद्धिमत्ता व रोजगार यांचा परस्पर संबंध एकमेकांशी नाही.
 
 
पालकी शर्मा नामक एका पत्रकार मुलीने वृत्तपत्रासंबंधी काही प्रश्न ट्विटर वरून जनतेला विचारले होते. याचे उत्तर देताना अभिषेक बच्चनने प्रतिप्रश्न केले की आजच्या काळात वृत्तपत्र कोण वाचतं? अभिषेकच्या या प्रश्नाला उत्तर देताना पालकी म्हणाली की बुद्धिमान लोक अजूनही वृत्तपत्राचे वाचन करतात. या प्रश्नाने गडबडून जाऊन अभिषेक बच्चन म्हणाला, रोजगार आणि बुद्धिमत्तेचा काहीही संबंध नाही. आज तुमच्याकडे नोकरी आहे पण तुम्ही बुद्धिमान नाही हे तुमच्या ट्विटवरून समजून येते.
 
 
हे वाचून इतर ट्विटर वापरकर्त्यांनी अभिषेक बच्चनला दुर्लक्ष करण्याचे सल्ले दिलेले आहेत. यातूनच अभिषेक बच्चनची लोकप्रियता समजून येते.
 
 
 
Powered By Sangraha 9.0