अनंत अंबानीकडून साईंच्या चरणी दीड कोटींची देणगी

24 Oct 2022 17:18:32
ANAT 2




शिर्डी : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर शिर्डीच्या साईबाबाचं दर्शन घेतलं.  या भेटी दरम्यान, अनंत अंबानी यांनी शिर्डी साई संस्थानला तब्बल १ कोटी ५१ लाख रुपयांची देणगी दिली. मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांकडे त्यांनी देणगीचा चेक सुपूर्द केला. याबाबत मंदिर समितीच्यावतीने अंबानी यांचे आभारही मानण्यात आले.
अनंत अंबानी यांनी साई बाबांच्या मध्यान्ह आरतीचा हजेरी लावली होती. साई संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी अनंत अंबनी यांचं स्वागत केले. अनंत अंबानी यांच्या शिर्डीच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. शिर्डीमध्ये दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर देशभरातील भाविक दर्शनासाठी येत असल्याने मोठी गर्दीही होते.




Powered By Sangraha 9.0