म्युझिक आर्टिस्ट दर्शन पाटील याने त्याच्या आगामी म्युझिक कामाची घोषणा केली आहे. एका मुलाखतीद्वारे त्यानी सांगितलं की तो आता बॉलीवूडचे कवर आणि चित्रपटांमध्ये बॅकग्राऊंड म्युझिक देण्याचे काम करणार आहे. गिटार वादनाद्वारे त्याचे म्युझिक व्हिडिओस यूट्यूब स्फोटिफाय आणि अशा अनेक म्युझिक प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित होतील. शिवाय त्याच्या स्वतंत्र अशा लेबल फॅक्टदर्शन म्युझिकचा यात मोलाचा वाटा असणार आहे. दर्शन म्हणाला की, आजवर मी फक्त लिखाण काम, म्युझिक एडिटिंग व पब्लिशिंग यावर लक्ष देत होतो, पण आता स्वतःच्या आवाजात सोशल मीडिया वर गाणे सादर करणं देखील माझ्यासाठी सोप्प नसेल, तरीही मी हे आव्हान स्वीकारत आहे.
हिंदी चित्रपटातही काम करणार
लॉक-डाऊन दरम्यान म्युझिक प्रॅक्टिस करत असताना, या म्युझिक बॉय व अनोख्या दिग्दर्शकाची ओळख झाली. वैभव व दर्शन ने याआधीही बॅकग्राऊंड म्युझिक कम्पोस करण्याचे काम केले आहे. वैभवची आगामी मराठी फिचर फिल्म '७२ रुपयांचा पाऊस' व वेब सिरीज 'द कर्स ऑफ भद्रावती' या मध्ये पाचोऱ्याचा दर्शन हा बॅकग्राऊंड म्युझिक देताना दिसणार आहे.
दर्शनने बोलताना सांगितले की, वैभव सोबत काम करण्याची माझी ही पहिली वेळ नाही, अगोदरही आम्ही अनेक संगीतकारांना यशस्वीपणे गूगल वर प्लॅटफॉर्म देण्याचे काम केले आहे. शिवाय त्याच दिग्दर्शन अनुभवून छोटस म्युझिक देण्याची ही माझी पहिली वेळ! त्यामुळे यावेळेस पहिल्यांदा एकत्र काम केले नसले तरी या प्रोजेक्टमधून खूप गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत.