कम्युनिस्ट हुकुमशाहीला विरोध; जिनपिंगचा तिळपापड

    20-Oct-2022
Total Views |
xi jinping
 
 
नवी दिल्ली ( Communist Dictator Xi Jinping ) : प्रजातंत्राच्या कोरड्या गप्पा मारणारे भारतीय काम्युनिस्ट चीनी हुकुमशाही विरोधात मुग गिळून गप्प बसतात. १९४९ साली चीनमध्ये राज्यक्रांती झाली आणि तानाशाहीच्या पोलादी भिंतीच्या आड चीनी जनता बंधिस्त झाली. तरीही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत चीनी जनता देशातील जुलमी आणि अत्याचारी अशा कम्युनिस्ट राजवटी विरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न करत असते. चीनी हुकुमशाह क्षी जिनपिंग यांच्या विरोधात राजधानी बींजिंग मधील एका पुलावर पोस्टर लावण्याची घटना ताजी असतानाच जगभरातील चीनी नागरिकांनी जिनपिंग विरोधी मुठ आवळायला सुरुवात केली आहे.
 
 
चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग ( Communist Dictator Xi Jinping ) तिसऱ्यांदा निवडून येण्यापूर्वी राजधानी बीजिंगमधील एका पुलावर एका व्यक्तीने त्यांच्या विरोधात पोस्टर लावले होते. पोस्टरमध्ये जिनपिंग यांच्या कोविड धोरणावर टीका करण्यात आली होती. आता चीन आणि जगभरात याविरोधात निदर्शने सुरू झाली आहेत. त्याचवेळी, विरोध दडपण्यासाठी चीन जगभरातील देशांमध्ये असलेल्या आपल्या दूतावासांमध्ये पोलीस ठाणे आणि न्यायालये उभारत आहे.
 
१६ ऑक्टोबर २०२२ रोजी जिनपिंग यांची तिसऱ्यांदा चीनचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली. ते सुरू होण्यापूर्वी, १३-१४ ऑक्टोबर रोजी बीजिंगच्या सिटॉन्ग ब्रिजवर एक बॅनर लावण्यात आला होता, ज्यामध्ये त्यांना हुकूमशहा म्हणून राष्ट्रपती पदावरून हटवण्याची ( Communist Dictator Xi Jinping ) मागणी करण्यात आली होती. आता हे बॅनर चीनच्या सोशल मीडिया ग्रुपवर व्हायरल होत आहे.
 
एका परदेशी वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, VoiceofCN नावाच्या अज्ञात चीनी नागरिकांचा समूह लोकशाही समर्थक इंस्टाग्राम खाते चालवतो. या गटाने सांगितले की, जिनपिंग ( Communist Dictator Xi Jinping ) यांना हटवण्याची मागणी करणाऱ्या घोषणा किमान आठ चिनी शहरांमध्ये पसरल्या आहेत. या आठ शहरांमध्ये शेनझेन, शांघाय, बीजिंग, ग्वांगझू तसेच हाँगकाँगचा समावेश आहे.
 
विशेष म्हणजे, या घोषणा बहुतेक सार्वजनिक स्नानगृहांमध्ये किंवा शाळांच्या सूचना फलकावर लिहिल्या होत्या अशी माहिती मिळते. अशीच एक घोषणा बीजिंगमधील चायना फिल्म आर्काइव्ह आर्ट सिनेमाच्या बाथरूममध्ये लिहिलेली आढळली. त्यावर 'हुकूमशाहीला विरोध करा' असे लिहिले होते.
 
 
याशिवाय परदेशात राहणारे चिनी नागरिकही हे बॅनर खूप शेअर करत आहेत. रिपोर्टनुसार, शी जिनपिंग यांच्या विरोधात ( Communist Dictator Xi Jinping ) हे नारे अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया आणि तैवानमधील २०० हून अधिक विद्यापीठांमध्ये देण्यात आले.
 
 
दुसरीकडे, लोकांचा आवाज दाबण्यासाठी चीनने आपल्या दूतावास आणि वाणिज्य दूतावासांमध्ये पोलिस चौक्या उघडल्या आहेत. यासोबतच तेथे न्यायालये चालवण्याचे आदेशही देण्यात आले, जेणेकरून सरकारविरोधातील कोणताही मतभेद दडपता येईल. इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम रिपोर्टिका या अहवालानुसार, चीन परदेशी भूमीवर चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या सरकारविरोधात आवाज दाबून चीनच्या लोकशाही कारभारात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत आहे.
 
ज्या दिवशी जिनपिंग तिसर्यांूदा निवडून आले, त्या दिवशी हाँगकाँगच्या लोकशाही समर्थक माणसाला मँचेस्टर, यूके येथील चिनी दूतावासात ( Communist Dictator Xi Jinping ) ओढले गेले आणि बेदम मारहाण करण्यात आली. ब्रिटनच्या संसदेने या घटनेचे वर्णन अतिशय चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी मँचेस्टर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.