जळगाव: जळगाव जिल्हा दूध संघात लोणी साठ्यात तब्बल सव्वा कोटीचा गैरव्यवहार झाल्याचं समोर आले असताना यावर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यामुळे आता सगळ्यांची चौकशी होणार असून जिल्हा दूध संघाचे अध्यक्षा मंदा खडसे यांच्या अडचणीतही वाढ होणार असल्याची शक्यता आहे. एकनाथ खडसेंनी जिल्हा दूध संघाच्या दूध पावडर व लोणी घोटाळा प्रकरणात गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी शहर पोलीस ठाण्यात तब्बल नऊ तास आंदोलन केले होते.
या प्रकरणात अखेर पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन गुन्हा दाखल केला आहे. यामुळे आता एकनाथ खडसे यांच्या पत्नी जिल्हा दूध संघाचे अध्यक्षा मंदा खडसे यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची शक्यता आहे. जिल्हा दूध संघातील दूध पावडर तसेच लोणी या घोटाळा प्रकरणी भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी दीड कोटी रुपयांच्या अपराचीराची तक्रार पोलिसात दिली होती. एकनाथ खडसे संचालक मंडळाच्या वतीने चोरीची तक्रार पोलिसात नोंदविण्यात आली होती. या दोन्ही तक्रारींची दखल घेत पोलिसांनी स्वतःच या प्रकरणी अपहाराचा गुन्हा दाखल करून घेतला आहे.