ऑनलाईन पेमेंट सेवा तासाभरापासून ठप्प! : UPI सर्व्हर डाऊन!

09 Jan 2022 19:48:14

NPCI
 
 
 
नवी दिल्ली : कॅशलेसच्या जमान्यात अनेक जण ऑनलाईन ट्रानझॅक्शन करणे पसंद करतात. मात्र देशात गेल्या तासाभरापासून यूपीआय सर्व्हर डाऊन झाले असून पेमेंट सुविधा ठप्प झाली आहे. यामुळे व्यवहार होत नसल्याने अनेक ग्राहक संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. याचा परिणाम समाज माध्यमांवर पहायला मिळत आहे.
 
 
 
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानेही याची पुष्टी केली आहे. तसेच ग्राहकांना होणाऱ्या त्रासाबद्दल त्यांनी ट्विटरवरून माफी मागितली. यात तांत्रिक अडचणिंमुळे सर्व्हरमध्ये काही त्रुटी निर्माण झाल्या असून सर्व्हर पुर्ववत होण्याचे काम सुरू झालं असल्याचे एनपीसीआयने सांगितले.
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0