भारतमाता युवा प्रतिष्ठान

05 Jan 2022 14:03:48

youth foundatuion.jpg


रा.स्व.संघाच्या संस्कार व प्रेरणेतून १९८९ साली बाळ गोपाळ नाट्यमंडळाची (भारतमाता युवा प्रतिष्ठान)स्थापना झाली. प्रतिष्ठान देव, देश, धर्मरक्षणासाठी सामाजिक बांधिलकीच्या, कर्तव्याच्या जाणिवेतून सामाजिक, आध्यात्मिक व सांस्कृतिक उपक्रम अनगाव व पंचक्रोशीतील गावांमध्ये राबवित आहे.

भारतमाता युवा प्रतिष्ठानची यशस्वी वाटचाल करताना कार्यकर्त्यांचे प्रचंड परिश्रम, कर्तव्यभावना आणि नि:स्वार्थ सेवा स्वाभाविकच आहे. पण त्याचबरोबर गावातील, परिसरातील थोरा-मोठ्यांचे आशीर्वाद तसेच संत, सज्जन नागरिक यांचे तन-मन-धनपूर्वक योगदान असल्यामुळे ही वाटचाल अधिकच यशस्वी होत आहे आणि म्हणून ‘भारतमाता युवा प्रतिष्ठान’ने छत्रपती श्री शिवरायांचे सदैव स्मरण व्हावे, याकरिता ‘श्री शिवस्फूर्ती प्रेरणा केंद्र’ व कार्यालयाच्या निर्माणाचे कार्य आपल्या सर्वांच्या सहकार्याने हाती घेतले आहे.याच सोबत ६०० चौरस फुटांचे सभागृह (कार्यालय) ही निर्माण करीत आहोत. या सभागृहाचा सदुपयोग विद्यार्थी अभ्यासिका, वाचनालय, प्रबोधन वर्ग, कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग व बैठक तसेच ग्रामीण भागातील शिक्षणासाठी येणार्‍या गरीब, गरजू विद्यार्थ्यांची निवास व्यवस्था करण्याचा उद्देश आहे. देव, देश, धर्म यामुळे हे केंद्र राष्ट्रनिर्माणाचे अधिष्ठान ठरते. हे ईश्वरी कार्य हाती घेताना ‘श्री शिवस्फूर्ती प्रेरणा केंद्र’ सामाजिक जागरणाच्या दृष्टीने सर्वांनाच दिशादर्शक ठरेल. प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक जाणिवेतून व कर्तव्यभावनेतून दोन्ही प्रकल्प हाती घेतले आहेत. या सेवायज्ञात समाजातील सज्ज्नशक्तीने निरपेक्ष सेवेच्या समिधा तन-मन-धनपूर्वक अर्पण कराव्यात ही विनंती! गेल्या ३१ वर्षांपासून प्रतिष्ठान आदर्श माघी सार्वजनिक श्री गणेशोत्सव कार्यक्रम -उपक्रमांतून संघटन, कीर्तन-प्रवचनातून समाज प्रबोधन, समाज जागरणाचे कार्य सुरू आहे.



शिवरायांचे आठवावे रूप । शिवरायांचा आठवावा प्रताप ॥
शिवरायांचा आठवावा साक्षेप । भुमंडळी ॥


छत्रपती शिवराय महाराष्ट्राचे शक्तिस्थान,श्रद्धास्थान. प्रतिष्ठानने छत्रपतींचे मंदिर स्थापन केले. छत्रपतींच्या शौर्याची आणि त्यागाची प्रेरणा समाजात सर्वत्र चेतवावी हा प्रतिष्ठानचा ध्यास आहे.मागील सहा वर्षांपासून तीन दिवसीय मातृ महोत्सवात आध्यात्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच समाजातील विविध क्षेत्रातील कर्तृत्त्ववान व गुणिजनांचा सन्मान मंडळाच्या ७५ सदस्यांनी ‘माधव नेत्रपिढी’करिता नेत्रदानाचा संकल्प केला आहे. दरवर्षी आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन होत असते.


गरीब व गरजू होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहाय्यता.
गरीब व गरजू पायी चालत येणार्‍या १२७ विद्यार्थ्यांना मोफत सायकल्सचे वाटप.
२०११ पासून विविध कबड्डी स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, जिल्हास्तरीय पोहण्याच्या स्पर्धांचे आयोजन.
२०१६पासून शिवपुण्यतिथीनिमित्त छत्रपती श्री शिवाजी महाराज अभिवादन रथयात्रा आयोजन - अनगाव ते किल्ले रायगड (महाड चवदार तळे) अशा पवित्र स्थानांतून जवळपास ७० गावांतून जल घेऊन छत्रपतींच्या समाधीवर जलाभिषेक करण्यासाठी असंख्य युवक चार दिवस या रथयात्रेत उत्स्फूर्तपणे सहभागी होत असतात. समाजातील उल्लेखनीय कार्य करणार्‍यांना संस्था व व्यक्तीस ‘सुखकर्ता कृतज्ञता पुरस्कार’ व ‘अनगावभूषण पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात येतो.
आतापर्यंतच्या झालेल्या वाटचालीतील सत्कारमूर्ती
२०१२ -‘पद्मश्री’ गिरीश प्रभुणे (भटके विमुक्त गुरूकुल, चिंचवड)
२०१३-अपर्णाताई रामतीर्थकर (सोलापूर)
२०१४ - हुतात्मा तुकाराम ओंबळे (मुंबई)
२०१५-शाहीर रंगराव पाटील (कोल्हापूर)
२०१६-स्व.सुनील चिंचोळकर (समर्थ भक्त, पुणे)
२०१७-चारूदत्त आफळे (राष्ट्रीय किर्तनकार, पुणे),
२०१८-विजय जाधव, (समतोल, मुंबई)
२०१९ - डॉ. गिरीश ओक, (अभिनेता, मुंबई)
सन २०२० - संजय भोसले (श्री कृष्णभक्त, पुणे)
अनगावभूषण पुरस्कार
२०१२-विद्या प्रसारक मंडळ, अनगाव
२०१३-प्रेमाताई घाग (आरोग्य सेवा)
२०१४-संजय राऊत (कुस्तीपटू)
२०१५-सुरेश (तात्या) लेले (मा. संघचालक)
२०१६-बळीराम भोईर (समाजसेवा), मा.श्री.गणपत देसले (समाजसेवा)
२०१७ -डॉ. विष्णू फडके (आरोग्यसेवा)
२०१८-भावेश मढवी (धावपटू),
२०१९ - सदानंद जाधव (अध्यात्म सेवा)
२०२०-डॉ.नलिनी ठोंबरे व सहकारी वृंद प्राथमिक आरोग्य केंद्र अनगाव- कोरोना काळातील विशेष सेवा.


 दिपक पाटील

 
Powered By Sangraha 9.0