नवी दिल्ली : भारत आणि इस्राएल यांच्यात असलेल्या मैत्रीच्या संबंधांना सोमवारी ३० वर्षे पूर्ण झाली. याचे औचित्य साधून एका विशिष्ट लोगोचे अनावरण यादिवशी करण्यात आले. इस्राएलचे भारतीय राजदूत नाओर गिलॉन आणि भारताचे इस्राएलमधले राजदूत संजीव सिंगला यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने या लोगोचे अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे एनआयडीच्या निखिल कुमार राय या भारतीय डिझायनरने हा लोगो तयार केला आहे.