शिवसेनेवर का आली अल्लाहु अकबर म्हणण्याची वेळ?

18 Jan 2022 14:50:08

Santosh Bangar
 
 
 
हिंगोली : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकांवर 'अल्लाहु अकबर' म्हणण्याची वेळ का आली, असा प्रश्न आता विचारला जात आहे. शिवसेनेवर तुष्टीकरणाचा आरोप केला जात असताना आता शिवसैनिकच 'अल्लाहु अकबर'चे नारे देऊ लागल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
 
 
 
हिंगोलीत शिवसेना शहर प्रमुख संतोष बांगर यांनी एका मौलानाला निवडणुकीत जिंकून आणण्याचा चंग बांधला आहे. यावेळी 'हमारे मौलाना के पिछे एक हजार एक टक्के अल्लाहचा आशीर्वाद आहे. यामुळे ते नक्कीच निवडणूकीत जिंकून येतील असा मला विश्वास आहे.', असे वक्तव्य संतोष बांगर यांनी केले. त्यानंतर त्यांनी "नारा ए तकबीर अल्लाहु अकबर" आशा घोषणा दिल्या आहेत.
 
 
 
 
 
 
भाजपतर्फे टीका
"शिवसेनेचा, जय श्रीराम पासूनचा प्रवास "नारा ए तकबीर अल्लाहु अकबर" पर्यन्त पोहचला! हिंगोली शिवसेना पक्ष प्रमुख संतोष बांगर काय म्हणत आहेत बघा. मौलानाला निवडून आणायचं आहे. प्रचारही जोरात चालू आहे. "नारा ए तकबीर अल्लाहु अकबर" आशा घोषणा देत प्रचार शिगेला पोहचवला आहे. कधी काळी हेच बांगर जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणायचे आता मात्र "नारा ए तकबीर अल्लाहु अकबर" नारे लावत आहेत.", अशी प्रतिक्रीया भाजप सोशल मीडिया संयोजक प्रकाश गाडे यांनी दिली आहे.
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0