मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना करोनाची लागण झाली आहे. करोनाची लागण झाल्यानंतर ९२ वर्षीय लता मंगेशकर यांना मंगळवार, दि. ११ जानेवारी रोजी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयातील अतिदक्षता विभागमध्ये त्यांना ठेवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. लता मंगेशकर यांना कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवत असल्याचे सांगण्यात आले आहे.
“लता मंगेशकर यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली असली तरी त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना कोरोना संसर्गाची सौम्य लक्षणे असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्या गृह विलगीकरणात किंवा ब्रीच कॅण्डी रुग्णालयात थांबून उपचार घेऊ शकतात,' अशी माहिती मुंबई महापालिका प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.