आता ग्राहकांसाठी नवी सुविधा : बीएनपीएल

24 Sep 2021 00:36:18
vividha_1  H x


आता ‘बाय नाऊ, पे लेटर’ (बीएनपीएल) हा नवा पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. ग्राहक कधीही वस्तू किंवा सेवेचा लाभ घेऊ शकतात व याचे ‘पेमेंट’ ‘क्रेडिट कार्ड’ न वापरता पुढच्या तारखेस किंवा काही दिवसांनी करू शकतात, हा पर्याय ग्राहकांमध्ये लोकप्रिय होत चालला आहे.

ग्राहक जेव्हा एखादे उत्पादन (वस्तू) विकत घेतात किंवा सेवेचा लाभ घेतात, त्याचे पैसे चुकते करण्यासाठी ‘कॅश’ देता येते, तसेच ‘डेबिट’ किंवा ‘क्रेडिट’ कार्डने ‘पेमेंट करता येते. हल्ली विविध ‘मोबाईल वॉलेट्स’ने पैसे देता येतात. या सर्व प्रकारांत तुम्हाला वस्तू घेतल्यानंतर किंवा सेवा घेतल्यानंतर तत्काळ पैसे द्यावे लागतात. ‘क्रेडिट कार्ड’ने पैसे दिल्यास ‘क्रेडिट कार्ड’चे बिल भरण्यास ग्राहकांना काही दिवसांचा कालावधी मिळतो.आता ‘बाय नाऊ, पे लेटर’ (बीएनपीएल) हा नवा पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. ग्राहक कधीही वस्तू किंवा सेवेचा लाभ घेऊ शकतात व याचे ‘पेमेंट’ ‘क्रेडिट कार्ड’ न वापरता पुढच्या तारखेस किंवा काही दिवसांनी करू शकतात, हा पर्याय ग्राहकांमध्ये लोकप्रिय होत चालला आहे.

‘बीएनपीएल’ सेवांचे प्रकार
यात एक प्रकार आहे ‘लेझी पे.’ (श्ररूू रिू) ‘लेझीपे’ची सोय ३०० हून अधिक ठिकाणी उपलब्ध आहे. ‘लेझी पे’ या व्यवहारांवर व्याजही आकारत नाही. आणखीन एक पर्याय म्हणजे ‘कॅपिटल फ्लोट बीएनपीएल’ यामार्फत खरेदी केल्याचे ‘पेमेंट’ तीन दिवसांनंतर पूर्ण करावे लागते व ‘पेमेंट’ची रक्कम जास्त असेल, तर ‘ईएमआय’ची सोयही मिळू शकते. ‘फिनटेक स्टार्टअप युनि’ने ‘पे लेटर’ कार्ड ‘लॉन्च’ केले आहे. यात ग्राहकांना एका विशिष्ट महिन्यांत केलेल्या खरेदीचे पैसे पुढील तीन महिन्यांत प्रत्येकी एक तृतीयांश इतकी रक्कम तीन वेळा भरता येते. बिलाच्या अतिरिक्त काहीही शुल्क आकारले जात नाही. समजा, ऑगस्ट महिन्यांत खरेदी केली, तर सप्टेंबर ते नोव्हेंबर या तीन महिन्यांत प्रत्येकी एक तृतीयांश रक्कम तीन हप्त्यांत भरावी लागेल. जर रक्कम खरेदी करतानाच भरली, तर बिलाच्या रकमेच्या एक टक्का रक्कम ‘कॅश बँक’ दिली जाते. या योजनेत खरेदीची मर्यादा 20 हजार रुपयांपासून सहा लाख रुपयांपर्यंत मिळू शकते.या योजनांमध्ये व वैयक्तिक कर्ज यात फरक आहे. वैयक्तिक कर्ज घेतल्यास ठरावीक दराने व्याज आकारले जाते. ही सेवा देणार्‍या प्रत्येकाने ग्राहकांना खरेदीसाठी वेगवेगळी कमाल मर्यादा ठरविलेली आहे. ग्राहकाला खरेदी करण्यासाठी कमाल रक्कम ठरविताना ग्राहकांची पैसे परत करण्याची क्षमता, त्याचा ‘क्रेडिट प्रोफाईल’ व ‘क्रेडिट ब्युरो’कडून प्राप्त झालेला ‘डाटा’ यांचा विचार करुन ग्राहकांच्या खरेदीची मर्यादा ठरविली जाते.

सोय
‘बीएनपीएल’ ही सेवा ग्राहकांची सेवा म्हणून फार उत्तम आहे. ‘लेझी पे’ सेवेचा वापर करण्यासाठी, ‘लेझी पे’ अ‍ॅप ‘डाऊनलोड’ करावे लागते. त्यानंतर ‘साईन-इन’ करावयाचे. त्यानंतर तुम्ही किती मर्यादेपर्यंतच्या रकमेचे व्यवहार करू शकता, हे तपासायचे. हे झाल्यावर या अ‍ॅपने तुम्ही व्यवहार करू शकता. ‘कॅपिटल फ्लोट’साठी अर्ज करण्यासाठी पद्धती सोपी आहे व व्यवहारही तत्काळ सुरू करता येऊ शकतात. यात प्रथम ‘केवायसी’ प्रक्रिया पूर्ण करावी लागते. मर्चंट्सच्या संकेतस्थळावर खरेदीची रक्कम उपलब्ध करुन दिली जाते. ‘मोबीक्विक झीप’चे अ‍ॅप्लिकेशन तर काही सेकंदातच आपल्या मोबाईलवर ‘लोड’ करता येते. ‘बीएनपीएल’ सेवा ग्राहकांना जलद मिळू शकतात. कर्ज किंवा क्रेडिट कार्ड मिळण्यास काही कालावधी लागतो. तसा यात लागत नाही. ‘फिनरेक स्टार्टअप युनि’ हे ‘प्ले-स्टोअर’वरून ‘डाऊनलोड’ करावे लागते. हे डिजिटल कार्ड तत्काळ कार्यान्वित होते.
तत्काळ पेमेंट नाही
‘बीएनपीएल’ सेवा ही खास करून ज्यांना तत्काळ पेमेंट करावयाचे नाही, अशांसाठी आहे. ‘लेझी पे’ला 15 दिवसांत पेमेंट करावे लागते. ‘ईएमआय’ने पेेमेंट करण्यासाठी सुविधा स्वीकारली, तर काही सेवा पुरविणारे व्याज आकारतात, काही आकारात नाहीत. पण, यावर आकारण्यात येणारा व्याजदर हा कर्जावर किंवा ‘के्रडिट कार्ड’वर आकारण्यात येणार्‍या कर्जाच्या दरापेक्षा कमी असतो.
उशिरा केलेल्या पेमेंट्सचे शुल्क व व्याज
‘बीएनपीएल’ या सुविधेत ठरवून दिलेल्या वेळेत पेमेंट’ करावयास हवे. नाहीतर ‘लेट फी’ आकारली जाते. जर वेळेत ‘पेमेंट’ची रक्कम सेवा पुरवठादाराला दिली नाही, तर साधारणपणे दर दिवसाला दहा रूपये दंडाची रक्कम आकारली जाते. जर ‘लेझी पे’द्वारे ग्राहकाने पेमेंट बराच काळ केले नाही, तर त्याला ‘ब्लॅकलिस्ट’मध्ये टाकले जाते व तो त्यापुढे या सेवेचा लाभ घेण्यास कधीही पात्र ठरू शकत नाही. ‘कॅपिटल’ या सेवेचा लाभ घेण्यास कधीही पात्र ठरू शकत नाही. ‘कॅपिटल फ्लोट’ची ‘लेट फी’ १०० रूपये ते ४०० रूपये या दरम्यान आकारते. एक तृतीयांश रक्कम भरावयाच्या कार्डधारकांनाही ‘लेट फी’ त्यांनी किती रक्कम उशिरा भरली, त्या संख्येनुसार आकारली जाते. यात फक्त ‘लेट फी’ आकारली जाते. व्याज आकारले जात नाही. ‘क्रेडिट कार्ड’वर रक्कम जर वेळेत भरली नाही, तर मात्र व्याज आकारले जाते. ‘के्रडिट कार्ड’ची रक्कम जर वेळेत भरली नाही, तर मात्र व्याज आकारले जाते. ‘क्रेडिट कार्ड’ वापरणार्‍यांनीही ‘बीपीएनएल’ सुविधा वापरण्यास हरकत नाही, पण या दोन्ही सेवा किंवा यापैकी एक सेवा वापरताना तारतम्य बाळगावे. खरेदी करताना जो खर्च येईल ती रक्कम ठरलेल्या वेळेत आपणांस भरणे शक्य आहे की नाही, याचा पूर्ण विचार करावा.

‘क्रेडिट कार्ड’ तसेच ‘बीएनपीएल’ सुविधा आहे म्हणून अनावश्यक/गरज नसलेली खरेदी करू नये. घरी हॉटेलमधून पदार्थ मागविण्यासाठी अगोदर ग्राहकांसाठी ‘बीएनपीएल’ सुविधा उपलब्ध होती, पण आता ती बंद करण्यात आली आहे. या मागे ‘मार्केटिंग’ हेतू असतो. सुरुवातीला ‘बीएनपीएल’ सुविधा दिली की लोक खरेदी करणार व एकदा खरेदीची सवय झाली की, ते सवयीचे गुलाम होणार, अशा वेळी ‘बीएनपीएल’ सुविधा बंद करून त्यांना इतर मार्गे खरेदी करण्यास भाग पाडायचे, या तंत्राने खरेदी वाढते. वस्तूंची विक्री वाढविण्यासाठी ‘बीएनपीएल’ हा चांगला प्लॅटफॉर्म आहे. तसेच तुमच्याकडे पैसा नसला, तरी तुम्ही याने खरेदी करत राहता. परिणामी, बाजारपेठेत व्यवहार चालू राहून, अर्थचक्र चालू राहते. भविष्यात पैसे येतील, या आभासी कल्पनेने ‘बीएनपीएल’ तसेच ‘क्रेडिट कार्ड’ सुविधा वापरु नका. गरज असेल, तरच जबाबदारीने या सुविधा वापरा.
- शशांक गुळगुळे





Powered By Sangraha 9.0