न्यूझीलंड संघासाठी तैनात पाक पोलिसांनी खाल्ली २७ लाखांची बिर्याणी

23 Sep 2021 17:17:07

pak_1  H x W: 0
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांमध्ये पाकिस्तान आणि तेथील सुरक्षा हा जगभरातील क्रिकेट प्रेमींसाठी चर्चेचा विषय ठरली आहे. न्यूझीलंडने टी - २० सामन्याला अवघे काही तासचा शिल्लक असताना मालिका रद्द केली. यावेळी त्यांनी सुरक्षा पुरेपूर नसल्याने हा निर्णय घेतला असल्याचे न्यूझीलंड बोर्डाकडून सांगण्यात आले. तर, यानंतर लगेच इंग्लंडनेदेखील आपला पाकिस्तान दौरा रद्द केला. मात्र, आता यानंतर पाकिस्तानी पोलिसांचा एका हास्यास्पद प्रकार समोर आला आहे.
 
 
 
आधीच जगभरात सुरक्षेवरून पाकिस्तानची नाचक्की होत असताना पाकिस्तानी पोलिसांचा एक पराक्रम समोर येत आहे. न्यूझीलंड संघाच्या सुरक्षेसाठी तैनात पोलिसांनी ८ दिवसात तब्बल २७ लाख रुपयांची बिर्याणी खाल्ली असल्याची माहिती एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीने दिली आहे. त्यामुळे आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर टीका सुरु असताना पाकिस्तानी पोलिसांचेही हास झाले आहे.
 
 
 
पाकिस्तानी वृत्तवाहिनीने दिलेलेया माहितीनुसार, न्यूझीलंडचा संघाचा इस्लामाबादमधील सेरेना हॉटेलमध्ये मुक्काम होता. याठिकाणी इस्लामाबाद पोलीस खेळाडूंच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते. एकूण ५०० पोलिसांना हॉटेलमध्ये तैनात करण्यात आले होते. यामध्ये ५ पोलीस अधीक्षक आणि सहाय्यक अधिकाऱ्यांचा समावेश होता. या पोलिसांच्या जेवणाचे बिल २७ लाख रुपये झाले आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0