मुंबई आणखी एका संशयित दहशतवाद्याला अटक

18 Sep 2021 10:38:52

Mumbai_1  H x W
मुंबई : महाराष्ट्र एटीएस आणि मुंबई पोलिस गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबईतून मध्यरात्री उशीरा आणखी एक संशयीत दहशतवाद्याला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार. झाकीर असे या संशयीत दहशतवाद्याचे नाव आहे. जोगेश्वरी येथून रात्री उशीरा त्याला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याला नागपाडा एटीएस कार्यालयात चौकशीसाठी घेऊन जाण्यात आले.
 
 
ऐन गणेशोस्तवात दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने सहा दहशतवाद्यांना अटक केली होती. मुंबईसह देशभरातील आणखी काही राज्यांचे धागेदोरे सापडले होते. यामध्ये मुंबईत सायन भागात राहाणाऱ्या जान मंहम्मद या दहशतवाद्याचा समावेश होता. एटीएसने ताब्यात घेतलेल्या झाकीरचे अंडरवर्ल्डसोबत कनेक्शन असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
Powered By Sangraha 9.0