सोमय्यांच्या तक्रारीनंतर कारवाईला वेग
वाशिम : शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या पाच शिक्षण संस्थांवर ईडीतर्फे कारवाई करण्यात आली. खासदार गवळी या वाशिम जिल्ह्यातून पाचवेळा लोकसभेवर निवडून आल्या आहेत. किरीट सोमय्यांच्या आरोपानंतर गवळींवर ही कारवाई झाली आहे.
सोमय्या वाशिमच्या देगाव, शिरपूर आणि इतर तीन ठिकाणी दौऱ्यावर असताना गवळींच्या शिक्षण संस्थांमध्ये पाच वर्षात कोट्यवधींची रक्कम चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली होती. सोमय्यांच्या तक्रारीनंतर हे प्रकरण उघडकीस आले. २०११ मध्ये मुंबई उच्च न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयानेही या प्रकरणात घोटाळा झाल्याचे ताशेरे ओढले होते.
"भावना गवळींच्या टीमने १०० कोटींची लूट केली. १८ कोटी रुपये भावना गवळी यांनी विविध संस्थांमधून काढले आहेत. सात कोटींची चोरी झाली, अशी खोटी माहिती देण्यात आली. तसेच केंद्र सरकारचे ४४ कोटी, स्टेट बँकेचे ११ कोटी निधी प्राप्त करून बालाजी साखर कारखाना उभारला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसेना फक्त एवढंच काम करत आहे का?.", असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
१८ कोटींची रोख रक्कम काढणे, कार्यालयात ७ कोटी रोख ठेवणे तसेच NCDC आणि एसबीआयला फसविणे या प्रकरणात आरोप करत सोमय्या यांनी केंद्रातील राज्यमंत्र्यांची भेट घेतली. सोमय्या यांनी मुंबई महापौर किशोरी पेडणेकर, राजेंद्र वायकर, जितेंद्र आव्हाड, शंभर कोटींची बेहिशोबी मालमत्ता कारवाई झालेले छगन भुजबळ यांचेही नाव या यादीत टाकले आहे. पालिका अध्यक्ष यशवंत जाधव, आमदार यामिनी जाधव आणि मिलींद नार्वेकर यांचेही नाव या यादीत टाकण्यात आले आहे.