मेट्रो रखवडणार्‍या राज्य सरकारने जपानसमोर पसरले हात

29 Jul 2021 20:34:15

tope_1  H x W:

मेट्रो-3 प्रकल्पाकरिता 'जायका' या जपानी संस्थेने केली होती कोट्यवधीची आर्थिक मदत

मुंबई, दि. २९ (सोमेश कोलगे) : फडणवीस सरकारच्या काळात जपानच्या 'जायका' संस्थेने मेट्रोसाठी अर्थसहाय्य दिले होते. मात्र ठाकरे सरकारच्या काळात दुराग्रही राजकारणापायी हा प्रकल्प रखडला. आज राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी त्याच 'जायका'कडे आरोग्यव्यवस्थेच्या अनुषंगाने हात पसरले आहेत. त्यामुळे मेट्रोबाबत झालेल्या राजकारणाचा परिणाम भविष्यातील गुंतवणुकीवर होणार का, हे आगामी काळात जायकाच्या भूमिकेमुळे कळेल.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 'जायका' या संस्थेने साधारणतः दोन हजार कोटी इतके अर्थसाहाय्य मेट्रो-3 साठी कर्जाच्या माध्यमातून दिले होते. विशेष म्हणजे मुंबईच्या विकासाला जपानी हातभार लाभवा यासाठी केंद्रातील मोदी सरकारनेदेखील पुढाकार घेतला होता. 'जायका' संस्थेने देखील केंद्र सरकारने घेतलेल्या पुढाकाराचा उल्लेख मदत देत असताना केला होता. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात मेट्रो-3 प्रकल्प रखडला. त्यावेळी महाविकास आघाडी सरकारने दूराग्रही राजकारण केले होते. महाविकास आघाडी सरकारच्या राजकारणाचा परिणाम भविष्यातील गुंतवणुकीवर होऊ शकतो, असा इशारा त्यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. मात्र महाविकास आघाडी सरकारने मेट्रो-3 बाबत समन्वयाची भूमिका घेतली नाही. आता त्याच जपानी संस्थेकडे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अर्थसहाय्य देण्याची विनंती केली आहे.

कर्करोग उपचारावरील सुविधांच्या उभारणीसाठी सहकार्य करावे, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जपानचे मुंबईतील वाणिज्यदूत डॉ. फुकाहोरी यासुक्ता यांच्याकडे केली.

सह्याद्री अतिथीगृह येथे जपानचे मुंबईतील वाणिज्यदूत डॉ. यासुक्ता यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची सदिच्छा भेट घेतली.

महाराष्ट्र आणि जपानचे नेहमीच सहकार्याचे संबंध राहिले आहेत. पर्यटन तसेच पायाभूत सुविधांच्या विकासकामांसाठी जपान सरकारच्या ‘जायका’ संस्थेमार्फत अर्थसहाय्य केले जात आहे. त्यामध्ये मुंबईतील मेट्रो सारख्या प्रकल्पांचा समावेश आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य क्षेत्राचे महत्त्व लक्षात घेता राज्यातील आरोग्य यंत्रणेच्या उभारणीसाठी ‘जायका’कडून अर्थसहाय्य मिळाल्यास त्याचा या क्षेत्राला लाभ होईल. राज्य कामगार आरोग्य विभागाच्या वरळी आणि मुलुंड येथील जागेवर सूपर स्पेशालिटी हॉस्पीटल उभारणीसाठी देखील जायकाकडून आर्थिक सहाय्य मिळावे, असे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

कर्करोग उपचारासाठी रेडीएशन थेरपी उपचाराकरिता यंत्रणा उभारणीसाठी जपानकडून तंत्रज्ञान आणि अर्थसहाय्य उपलब्ध करून देतानाच जालना येथे कर्करोग उपचार रुग्णालय उभारणीकरिता सहकार्य करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

Powered By Sangraha 9.0