व्हीआयपी, अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री करणार सपत्नीक विठ्ठलाची पूजा; पंढरपूरकडे रवाना

19 Jul 2021 16:11:27
pandharpur _1  


मुंबई -
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरामध्ये होणाऱ्या शासकीय पूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सपत्नीक पंढरपूरला रवाना झालेत. खराब हवामानामुळे हवाई मार्गाने पंढरपूरला पोहोचणे शक्य नसल्याने ते रस्तेमार्गाने पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. या सात ते आठ तासांच्या प्रवासामध्ये मुख्यमंत्री स्वत: आपली गाडी चालवत आहेत.
 
 
मर्सिडीज ऐवजी रेंज रोव्हर गाडी घेऊन मुख्यमंत्री पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. ही गाडी आदित्य ठाकरे वापरत असतात. मात्र, सध्या पावसाचा धोका, तुंबलेलं पाणी यामुळे उंच गाडी हवी, म्हणून मुख्यमंत्री ते वापरत असलेली मर्सिडीज ऐवजी आदित्य ठाकरे वापरत असलेले रेंज रोव्हर गाडी घेऊन पंढरपूरकडे रवाना झाले. सध्या मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर तुफान पाऊस आहे. समोरची द कमी आहे. अशावेळी मुख्यमंत्री सफाईदारपणे गाडी चालवत आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत पत्नी रश्मी शेजारच्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रात्री नऊ वाजताच्या सुमारास पंढरपुरात पोहोचतील.
 
 
 
मुख्यमंत्री विमानाने जाऊ शकत होते, मात्र सध्याचं हवामान आणि दृश्यमानता कमी असल्याने ते बाय रोड अर्थात रस्ते मार्गे पंढरपूरकडे रवाना झाले. मुंबई ते पंढरपूर या प्रवासादरम्यान मुख्यमंत्री लोणावळाजवळ काही वेळ चहापानासाठी, विश्रांतीसाठी थांबण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मुसळधार पाऊस सुरु आहे. एक्सप्रेस वेवर काही ठिकाणी पाणी साचल्याचंही पाहायला मिळत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील सर्व गाड्यांचे पार्किंग लाईट्स ऑन करुन ड्रायव्हिंग केलं जात आहे.
Powered By Sangraha 9.0