कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांबरोबर जयंत पाटलांची उद्या बैठक

18 Jun 2021 16:37:32

jayant patil _1 &nbs



मुंबई:
अलमट्टी धरणातून होणार्‍या पाण्याच्या विसर्गामुळे पूरपरिस्थितीला सामोरे जावे लागते. त्यामुळे या पूरनियंत्रणाचं काम महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही राज्यांच्या समन्वयाने कसं चांगलं होईल, यादृष्टीने कर्नाटकचे मुख्यमंत्री व महाविकास आघाडी सरकारचे मंत्री जयंत पाटील यांची शनिवारी सकाळी १०.३० वाजता बैठक होणार आहे.
अलमट्टी धरणातून होणार्‍या पाण्याच्या विसर्गामुळे पूरपरिस्थिती निर्माण होते. त्यामुळे या पूरनियंत्रणाचं काम महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही राज्यांच्या समन्वयाने करण्यासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्री बी.एस.येडीयुरप्पा यांच्यासोबत शनिवारी सकाळी १०.३० वाजता बैठक होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. यावेळी जलसंपदा विभागाचे सचिव आणि अधिकारी यांना घेऊन ही चर्चा होणार आहे. ही थेट चर्चा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी होणार आहे.

 राज्यांना कमी नुकसान होईल याबाबत चर्चा कृष्णा नदीचा महापूर आणि त्यातून अलमट्टीच्या पाण्याचे नियोजन, महाराष्ट्रातल्या कृष्णा खोऱ्यातील व कर्नाटकच्या कृष्णा खोऱ्यातील जनतेला जे नुकसान सोसावे लागते त्यापासून कमीत कमी कसं नुकसान होईल आणि पूरनियंत्रणाचं काम दोन्ही राज्यांच्या समन्वयाने कसं चांगलं होईल यादृष्टीने ही बैठक आयोजित करण्यात आल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. यापूर्वी सचिव स्तरावर बैठक पार पडली. आता मंत्री स्तरावर बैठक होत आहे. शेजारील राज्याशी संवाद चांगला कसा होईल हा प्रयत्न असणार आहे असेही जयंत पाटील यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0