‘चिनी व्हायरस’ची दुसरी लाट आणि भारतविरोधी तत्त्वे

08 May 2021 22:07:16

corona_1  H x W
 
 
 
फेब्रुवारीच्या दुसर्‍या आठवड्यापर्यंत भारतामध्ये चिनी व्हायरसवर पूर्णपणे विजय मिळवण्यात आला होता आणि देशाचे लक्ष हे ‘व्हॅक्सिन डिप्लोमसी’ आणि आर्थिक व्यवस्था मजबूत करण्यावरती केंद्रित होते. परंतु, अचानक पुढच्या एक महिन्यामध्ये सगळेच उलटे झाले. अचानक चिनी व्हायरसचा मोठा उद्रेक झाला आणि सध्याची परिस्थिती आणीबाणीची आहे.
 
 
कोरोना विषाणूची लाट चीनमध्ये थांबली, पण हजारो किलोमीटर दूर पसरली. भारतामध्ये तर सध्या या ‘चिनी व्हायरस’च्या दुसर्‍या लाटेने हाहाकार माजवला आहे. यामध्ये रोज हजारो भारतीय मृत्युमुखी पडत आहेत. अशा प्रकारची महामारीची लाट किंवा देशाचे नुकसान १०० वर्षांतून फक्त एकदाच होते. भारताच्या राष्ट्रीय जीवनामध्ये आतापर्यंत आलेले हे सर्वात मोठे ‘जैविक महासंकट’ आहे. ही ‘चिनी व्हायरस’ची लाट आपोआप आली की, चीनमुळे आली, याविषयी अजूनही माध्यमांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ चर्चा करताना दिसतात. मागच्या वर्षी या वेळेला ‘चिनी व्हायरस’ची सुरुवात चीनच्या वुहान प्रांतांमधून झाली होती. परंतु, ‘जागतिक आरोग्य संघटना’ हे चीनच्या हाताखाली काम करणारं मांजर आहे. त्यांनी ही बाब सगळ्या जगापासून लपवून ठेवली. त्यानंतर अचानक ती लाट चीनमध्ये थांबली. मात्र, हजारो किलोमीटर दूर असलेल्या अमेरिका, युरोप, भारतात आणि आफ्रिका खंडामध्ये जाऊन पोहोचली.
 
 
‘चिनी व्हायरस’ उपखंडाच्या इतर देशात पसरला नाही
 
 
आता आलेली दुसरी लाट ही भारतात आलेली आहे. सर्वांना चकित करणारी बाब ही आहे की, ‘चिनी व्हायरस’ भारतीय उपखंडाच्या इतर देशांमध्ये म्हणजे पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ आणि भूतानमध्ये फारसा पसरला नाही. हे सगळे देश, त्यांची जमीन, भौगोलिक स्थिती, हवामान, वातावरण अगदी भारताप्रमाणेच आहे. परंतु, ते देश तुलनेने सुरक्षित राहिले आणि परिणाम हा फक्त भारतावरती झाला. मग असे का झाले?
 
 
ही दुसरी लाट मोठी शहरे म्हणजे मुंबई, पुणे, दिल्ली येथे पोहोचली. ही शहरे आर्थिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाची आहेत. कुंभमेळा किंवा ज्या प्रांतात निवडणुका झाल्या होत्या, तिथून कोरोना लाट अजूनपर्यंत आलेली नाही.
 
 
चिनी व्हायरस अजून ताकदवान होत आहे
 
 
चिनी व्हायरसमध्ये जनुकीय बदल (व्हायरस म्युटेशन)होत आहेत. परंतु, त्यामुळे व्हायरस कमजोर होण्याऐवजी त्याचे झालेले दुसरे, तिसरे जनुकीय बदल हे पहिल्या व्हायरसपेक्षा जास्त ताकदवान आहेत. जनुकीय बदल झालेला व्हायरस हा पहिल्या व्हायरसपेक्षा कमी ताकदवान असतो.
 
 
यामुळे शंका येते की, ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चा वापर करून चीनकडून या व्हायरसमध्ये जनुकीय बदल केले जात आहेत का? मागच्या दशकांमध्ये ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रोग्राम’ बनवणारे वैज्ञानिक हे अल्गोरिदम तयार करायचे आणि मग ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ त्यांनी दिलेल्या अल्गोरिदमप्रमाणे काम करायचे. आता ‘मशीन लर्निंग’ नावाचा प्रकार सुरू झालेला आहे. यामध्ये मशीन स्वतःहून शिकत असते. एकदा का आपण मशीनला ही परवानगी दिली/एक काम दिले, तर ते सुपरव्हिजनच्या शिवाय आपली बुद्धी वापरून आपले काम करू शकते. मशीन स्वतःहून शिकत असते. चिनी व्हायरस ज्यावेळेला ‘व्हॅक्सिन’ घेतलेल्यांना किंवा तरुणांना भेटतो, त्यावेळेला यामध्ये नक्कीच जनुकीय बदल हे होतात. परंतु, आता हा व्हायरस एक प्रोग्राम केल्याप्रमाणे, ‘मशीन लर्निंग’मुळे स्वतःहून विचार करून ताकदवान होत आहे. यामागे चीनच आहे. काही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, हा चिनी व्हायरस ‘डार्विनच्या थेअरी’प्रमाणे स्वतःला वाचवायचे काम करत आहे.
 
 
जगाच्या विरुद्ध एक मोठे शस्त्र
 
 
परंतु, एवढे नक्की की जनुकीय बदल हा प्रकार अमानवीय भयंकर (unethical) आहे. जगातल्या शास्त्रज्ञांना वेगवेगळ्या विषयावरती संशोधन करायला परवानगी असते. परंतु, संशोधन असे असावे, ज्यामुळे मानवजातीला फायदा होईल आणि त्यांची रोगांना समोर जायची ताकद वाढेल. पण, चीन चांगले संशोधन करायच्या ऐवजी आपले लक्ष मानवजातीला धोका असलेल्या संशोधनावरती केंद्रित करत आहे. कारण, त्यांना हे संशोधन जगाच्या विरुद्ध एक मोठे शस्त्र म्हणून वापरायचे आहे. चीनशी पुष्कळ वाटाघाटी करुन ‘जागतिक आरोग्य संघटने’च्या शास्त्रज्ञांना चीनमध्ये प्रवेश मिळाला खरा. मात्र, त्यांना चीनकडून कुठलीही ठोस माहिती पुरवण्यात आली नाही, म्हणजेच त्यांचा दौरा पूर्णपणे वाया गेला.
 
 
एक ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञ या चमुचा भाग होता आणि त्याने महत्त्वाची माहिती जागतिक माध्यमांपर्यंत पोहोचवली आहे. त्याच्या म्हणण्याप्रमाणे हा व्हायरस नोव्हेंबरपासून चीनमध्ये पसरत होता. परंतु, जगापासून ही माहिती लपवण्यात आली. एवढेच नव्हे, तर चीनने हा व्हायरस पसरू नये म्हणून चीनमध्ये देशांतर्गत विमानसेवा पूर्णपणे बंद केली. मात्र, त्याच वेळेला लाखो चिनी जगभरामध्ये काम, शिक्षण, पर्यटन आणि इतर कारणांमुळे जाऊन हा व्हायरस पसरवत होते. म्हणजेच, चीनने देशाच्या आतली विमानसेवा बंद केली. मात्र, आंतरदेशीय सेवा वाढवली आणि व्हायरसचा प्रसार केला.
 
 
चीनमध्ये अनेक धोकादायक व्हायरस उपलब्ध
 
 
या कोरोनावर मात करण्यात अपयश येत असताना आता आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. एका शोधकर्त्यांच्या टीमने दावा केला आहे की, चीनच्या वुहानमध्ये सध्याच्या कोरोनापेक्षाही धोकादायक कोरोना व्हायरस सापडला आहे. चीन पुन्हा एकदा जगाला अडचणीत आणू शकतो. हा व्हायरस जास्त धोकादायक असू शकतो. शास्त्रज्ञांनी म्हटले की, चीनच्या वुहान आणि अन्य शहरातील कृषी प्रयोगशाळेत (अ‍ॅग्रिकल्चर लॅब्स)मध्ये व्यक्तींना नुकसान पोहोचवणारे अनेक धोकादायक व्हायरस उपलब्ध आहेत. जर याला सुरक्षितपणे कंट्रोल केले गेले नाही, तर संपूर्ण जगाला अडचणीत आणले जाऊ शकते. वेगाने पसरणार्‍या या कोरोनाच्या प्रादुर्भावामागे विषाणूचे दुहेरी म्युटेशन (दुहेरी जनुकीय बदल) कारण आहे.
 
 
भारताविरुद्ध दुष्प्रचार युद्ध
 
 
फेब्रुवारीच्या दुसर्‍या आठवड्यापर्यंत भारतामध्ये चिनी व्हायरसवर पूर्णपणे विजय मिळवण्यात आला होता आणि देशाचे लक्ष हे ‘व्हॅक्सिन डिप्लोमसी’ आणि आर्थिक व्यवस्था मजबूत करण्यावरती केंद्रित होते. परंतु, अचानक पुढच्या एक महिन्यामध्ये सगळेच उलटे झाले. अचानक चिनी व्हायरसचा मोठा उद्रेक झाला आणि सध्याची परिस्थिती आणीबाणीची आहे. आता भारत लस निर्यात करण्याऐवजी आयात करत आहे. मात्र, या कठीणसमयी युरोप आणि अमेरिका भारताला मदत करायला तयार नव्हते. उलटे अमेरिकेतल्या फार्मा कंपनी म्हणत होत्या की, ‘व्हॅक्सिन फॉर्म्युला’ भारताबरोबर शेअर केला जाऊ नये. भारताने जगाची फार्मसी बनू नये, म्हणून युरोप आणि अमेरिकेने लस तयार करण्याकरिता लागणार्‍या कच्च्या मालावर बंदी घातली. कारण आर्थिक होते, या फार्मा कंपनीचा सहा अब्ज डॉलरचा व्यापार भारतातल्या कंपन्यांनी हस्तगत केला होता. याच वेळेला भारतातल्या मीडियातले काही जण भारतात आणि भारताच्या बाहेर भारताविरुद्ध दुष्प्रचार युद्ध करण्यात गुंतलेले होते. असे दाखवण्यात आले की, कुंभमेळा आणि पश्चिम बंगालमध्ये झालेल्या निवडणुकांच्या प्रसारामुळे हा व्हायरस वाढला. हा व्हायरस दिल्ली आणि महाराष्ट्रमध्ये आहे, जिथे निवडणुका आणि कुंभमेळ्याचा काहीही संबंध नव्हता. भारतात परिस्थिती गंभीर आहे हे दाखवण्याकरिता ट्विटर आणि इतर ‘सोशल मीडिया’चा वापर करण्यात आला. स्मशानभूमीची चित्रेही हजारो रुपयांना विकण्याकरिता इंटरनेटवर ठेवण्यात आली. ‘टूल किट गँग’ पुन्हा एकदा आक्रमक झाली. भारतातल्या चिनी हस्तकांनी मदत करून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला बदनाम करण्याचा भयंकर प्रयत्न केला.
 
 
आता लाज वाटल्यामुळे अमेरिका आणि युरोपियन देशांनी भारताला मदत करणे सुरू केले आहे. भारताला जर चीनचे हे जैविक महायुद्ध जिंकायचे असेल, तर देशातील राजकीय पक्षांना, वेगवेगळ्या संस्थांना आणि सामान्य भारतीयांना एकत्र येऊन काम करावे लागेल. हे महायुद्ध अजून अनेक वर्षे चालेल. ते तुमच्या-आमच्या दारापर्यंत, घराघरांत पोहोचलेले आहे. प्रत्येक गोष्टीची जबाबदारी सरकारवर ढकलून चालणार नाही. युद्धतंत्र बदलत आहेत. यापुढे रात्रच नाही तर दिवसही वैर्‍याचा आहे. येणारे दिवस अजूनही बिकट असू शकतात. त्यामुळे यापुढे आम्ही कसे वागतो, येणार्‍या कठीण प्रसंगांना एक नागरिक, एक राष्ट्र, म्हणून कसे सामोरे जातो, यावरच आपल्या देशाचे भवितव्य अवलंबून आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0