'UPSC'साठी आता गुगल फॉर मॅप्स; 'आयएएस' अधिकाऱ्यांचा उपक्रम

07 May 2021 14:11:57
START UP-UPSC OLINE COACH
 
 
 
अलाहाबाद - सध्याच्या काळात जेव्हा आपल्याला प्रत्यक्ष संपर्कात येऊन शिकणे शक्य नाही, अशा काळात  स्पर्धा परिक्षेतील विद्यार्थी ऑनलाईन प्लॅटफॉर्म संस्थेचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करून घेत आहेत. दिल्ली किंवा पुण्याला जाऊन अभ्यास करण्यापेक्षा घरी बसून अभ्यास करणे आता 'examarly' या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममुळे अधिक सोयीस्कर आणि स्वस्त होणार आहे.
 
 
"स्पर्धा परिक्षांबाबत ज्ञान देणारे अभ्यास साहित्य आज बाजारात आणि समाज माध्यमांवर उपलब्ध आहे. परंतु, 'upsc' मध्ये अभ्यासाइतके नियोजन पण फार महत्वाचे आहे, असे २६ वर्षीय निशांत शुक्ल म्हणतो. त्यामुळे निशांतने सह-संस्थापक सुशांत शुक्ला, ईशान मालवीय आणि थ्रीभुवन एचएल यांच्यासमवेत कोरोनाच्या काळात  'examarly' ही कंपनी सुरू केली. निशांत आणि सुशांत यांना स्पर्धा परिक्षा देताना या परिक्षेमागील आव्हाने आणि त्याचे स्वरुप लक्षात आले. त्यामुळे स्पर्धा परिक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी त्यांनी 'examarly' ही मासिक सदस्येवर आधारित असे ऑनलाईन प्लॅटफॉर्म सुरू केले आहे.
 
 
 
यामध्ये मुलांच्या तयारीचे नियोजन करून देणे, वेळोवेळी परीक्षा घेणे तसेच कोणती पुस्तके वाचावीत कोणती नाहीत अशा गोष्टींची माहिती आॅनलाईन  प्लॅटफार्मवर देण्यात येईल. निशांत आणि सुशांत हे भाऊ असून त्यांनी 'upsc' ची तयारी केली आहे. त्या काळात त्यांना समजलेल्या अनेक गोष्टी या अॅपव्दारे ते विद्यार्थ्यांना सांगणार आहेत. परीक्षेच्या तयारी करते वेळी मुख्य ७ विषय असा ध्येय ठेवून अभ्यास करण्यापेक्षा १०० छोटे छोटे विषय वाटून त्याचा अभ्यास केल्यास आपल्यास त्याचा फायदा होऊ शकतो, असे २४ वर्षीय सुशांत म्हणतो. अलहाबाद येथून या अॅपवर नियंत्रण ठेवले जाईल. दरमहा ५०० रुपये देऊन सदस्यत्व घेऊन यातील प्रशिक्षणाचा फायदा घेता येईल. 'upsc' ची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना याचा नक्कीच लाभ होणार आहे. 
 
 
Powered By Sangraha 9.0