कीर्तनकार नरहरीबुवा गोखले यांचे निधन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-May-2021
Total Views |

kirtankar_1  H
 
 
खोपोली : कोरोना अनेक लोकांंचे जीव घेत आहे. अनेक दिग्गज व्यक्ती या रोगाचे शिकार झाले आहेत.वारंवार आपल्याला दूखद बातम्या ऐकावयास मिळत आहे.अजून एक दूखद बातमी समोर आली आहे ती म्हणजे  कीर्तनकार नरहरीबुवा गोखले यांचे निधन.महाराष्ट्राने अजून एक आपला हीरा गमावलेला आहे.
 
 
सुप्रसिद्ध किर्तनकार नरहरीबुवा गोखले वय वर्ष ७१ यांचे आज कोरोनामुळे नृसिंहवाडी येथे दुःखद निधन झाले. नरहरी गोखले हे खोपोलीच्या पेपको कंपनीमध्ये कामाला होते. कंपनी बंद झाल्यानंतर त्यांनी कीर्तनाचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर गेली चाळीस वर्षे ते महाराष्ट्रभर कीर्तनाद्वारे समाज प्रबोधनाचे कार्य करीत होते. त्यांचे सुपुत्र विवेकबुवा गोखले हेही सुप्रसिद्ध कीर्तनकार आहेत.
@@AUTHORINFO_V1@@