बाळासाहेब थोरात यांच्या पत्राची दखल कुणी घेतली का ?

27 Apr 2021 21:32:19



Thorat_1  H x W


नगर जिल्ह्यातील वास्तव मांडणारे पत्र मुख्यमंत्र्यांना उद्देशून लिहिले होते


मुंबई (विशेष): राज्याचे महसुल मंत्री आणि कोंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून काल एक पत्र लिहिले होते. बाळासाहेब थोरात यांनी नुकताच नगर जिल्ह्याचा दौरा केला होता. त्यानुषंगाने थोरात यांनी हे पत्र लिहिले होते. बाळासाहेब थोरात यांनी वस्तुस्थिती समजून घेऊन हे पत्र लिहिले, याबद्दल नगरवासी त्यांचे आभार मानीत होते. पण या पत्राची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली का, हा प्रश्न आता उपस्थित केला जातो आहे.


बाळासाहेब थोरात यांनी नगर जिल्ह्याचा दौरा केला. चार्टर्ड विमानाने थेट दहा हजार रेमडीसीवर आणल्यावर नगर जिल्ह्याचे भाजप खासदार सुजय विखे-पाटील चर्चेत आले होते. त्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी हा दौरा केला. त्यामुळे बाळसाहेब थोरात यांच्या दौर्‍यात स्थानिक स्तरावरील दबाव कारणीभूत होता का, हा देखील एक प्रश्न आहे.


मी गेल्या काही दिवसांपासून विविध भागात जाऊन कोरोना स्थितीचा आढावा घेत आहे. महाविकास आघाडी सरकार कोविड विरोधातील लढाई पूर्ण ताकदीने लढत आहे, कोविड व्यवस्थापन करताना काही गोष्टींकडे अधिक लक्ष दिल्यास कोरोनावर मात करणे अधिक सोपे होईल, मा. @CMOMaharashtra यांना पत्राद्वारे कळविले. pic.twitter.com/wU7vPzMlbV

— Balasaheb Thorat (@bb_thorat) April 26, 2021 ">

बाळासाहेब थोरात यांनी दौरा करून झाल्यावर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिले. बाळसाहेब थोरात यांनी लिहीलेल्या पत्रात नगर जिल्ह्यातील भीषण वास्तव मांडले होते. जिल्ह्यात आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल येण्यासाठी 24 ते 48 तासांचा अवधी लागतो तसेच पॅरासीटेमोलसारखी औषधेही जिल्ह्यात पुरेशी उपलब्ध नसल्याचे बाळासाहेब यांनी पत्रात लिहिले होते.


काल 26 एप्रिल रोजी बाळासाहेब थोरात यांनी हे पत्र समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केले होते. त्यानंतर मात्र या पत्राची चर्चा रंगली. पण काल लिहिल्या गेलेल्या या पत्राची अद्याप मुख्यमंत्री महोदयांनी दखल घेतली आहे का, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. कारण त्याविषयीची कोणतीही माहिती बाळासाहेब थोरात यांनी जाहीर केलेली नाही. तसेच प्रशासकीय पातळीवर नगर जिल्हयासाठी काही प्रयत्न सुरू झाल्याचेही समजत नाही. मग बाळासाहेबांचे पत्र असेच सरकारदरबारी पडून राहणार की त्यांच्या सूचना सरकार गांभीर्याने घेणार, हा प्रश्नच आहे.

Powered By Sangraha 9.0