गडचिरोलीच्या एटापल्ली तालुक्यात नक्षलवादी हल्ला

22 Apr 2021 13:05:50

gadchiroli_1  H


गडचिरोली :
एटापल्ली तालुक्यातील जांबिया-गट्टा पोलीस ठाण्यावर नक्षलवादी हल्ला झाला आहे. मात्र यात कुठलीही हानी झाली नाही, रात्री १२च्या सुमारास लोकवस्तीकडून पोलीस ठाण्याच्या दिशेने गोळीबार करण्यात आला. गावठी ग्रेनेडचा वापर करून एक बॉंब देखील फेकला गेला, सुदैवाने बॉम्ब न फुटल्याने मोठी हानी टळली. पोलीस पथकाने प्रत्युत्तर देत गोळीबार केला. या हल्ल्यावेळी ५०च्या संख्येत नक्षलवादी असल्याची माहिती मिळत आहे.
Powered By Sangraha 9.0