चंद्रपूर : महाराष्ट्रात कोरोनाची आकडेवारी सर्व विक्रम मोडत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने कठोर निर्बंध जाहीर केले आहेत. या काळात रुग्णालयांची अवस्था वाईट आहे. या दरम्यान, एका व्यक्तीचा व्हीडिओ व्हायरल होत आहे. ज्यात संबंधित व्यक्ती आपल्या वडिलांना कोरोना उपचारासाठी दाखल करून घ्या, अशी मागणी करत आहेत.
व्हीडिओत मुलाने संताप व्यक्त केला आहे. "एकतर माझ्या वडिलांना रुग्णालयात उपचारासाठी बेड द्या नाहीतर इंजेक्शन देऊन मारून तरी टाका" किशोर नाहरशेटीवर, असे त्याचे नाव आहे. मंगळवारी दुपारपासून तो आपल्या वडिलांच्या इलाजासाठी भटकत आहे. बेड न मिळाल्याने दोन राज्यांचा प्रवास त्याने केला आहे. हा व्हीडिओ चंद्रपूर जिल्ह्याचे असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.
किशोर यांनी महाराष्ट्रातील रुग्णालयांचा तपास घेतला. बेड न मिळाल्याने तो गेल्या २४ तासांत तेलंगणामध्ये रुग्णालयात चकरा मारत आहे. वरोडा आणि चंद्रपुरच्या रुग्णालयांमध्येही बेड मिळतो का याची चाचपणी केली होती. इतकच काय खासगी रुग्णालयातही त्यांना बेड मिळाला नाही. रात्री १.५० वाजता तेलंगणामध्ये पोहोचले.
तेलंगणाहून महाराष्ट्रात पुन्हा येऊन बेड शोधत आहेत. ज्या रुग्णवाहिकेत वडिल आहेत. तिथल्या ऑक्सिजनचा टँकही संपत चालला आहे. वडिलांना रुग्णवाहिकेत सोबत घेऊनच त्यांनी बेड शोधण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. वडिलांना अशा अवस्थेत घेऊन जाऊ शकत नाहीत. चंद्रपूर जिल्ह्यात सोमवारी ८५० रुग्णांची नोंद झाली आहे. इथे एकूण ७ हजार रुग्ण सक्रीय आहेत.